शिवसेनेचा गटनेता लोकसभा अध्यक्षांनी परस्पर बदलला : विनायक राऊतांचा आरोप

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत ( Vinayak Raut ) यांनी लोकसभा सचिवालय व लोकसभा अध्यक्षांवर पत्रकार परिषदेतून गंभीर आरोप केले.
Vinayak Raut
Vinayak RautSarkarnama

दिल्ली - लोकसभेतील शिवसेनेचा गटनेता बदलला गेला आहे. शिवसेनेचा नवा गटनेते शिंदे गटाचा दाखविण्यात आला आहे. या विरोधात शिवसेना आक्रमक झाली असून शिवसेनेचे खासदार विनायक राऊत ( Vinayak Raut ) यांनी लोकसभा सचिवालय व लोकसभा अध्यक्षांवर पत्रकार परिषदेतून गंभीर आरोप केले. ( Shiv Sena faction leader in Lok Sabha replaced by Lok Sabha speaker: Vinayak Raut's serious allegation )

शिवसेना खासदार विनायक राऊत म्हणाले, काल ( ता. 20 ) लोकसभा पोर्टलवर शिवसेनेच्या नवीन गटनेत्याचे नाव आम्हाला वाचायला मिळाले. शिवसेनेचा गटनेता म्हणून दोन वर्षांपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी माझी नियुक्ती केली होती. त्यानंतर शिवसेना संसदीय दलाची बैठक होऊन त्यामध्ये मुख्य भावना गवळी होत्या. त्यांच्या जागी खासदार राजन विचारे यांच्या नियुक्तीचे पत्र 6 जुलै 2022 ला लोकसभा अध्यक्ष, संसदीय कामकाज मंत्री यांना दिले होते.

Vinayak Raut
शिवसेना कुणाची ; अरुणाचल प्रदेशाची पुनरावृत्ती होईल का ? उज्जल निकम म्हणाले..

ते पुढे म्हणाले की, 18 जुलै 2022ला रात्री साडेआठ वाजता लोकसभा अध्यक्षांच्या घरी जाऊन शिवसेनेच्या गटनेते पदी कोणी दावा केला तर त्याची दखल घ्यायच्या अगोदर आम्हाला आमचे म्हणणे मांडायला संधी द्या, लोकसभा अध्यक्षांना 18 जुलैला रात्री व 19 जुलैला विनंती केली. कोणत्याही विनंती पत्राची दखल न घेता शिवसेना गटनेते बदलत राहुल शेवाळे यांची नियुक्ती केली. हे पत्र लोकसभा पोर्टलला 20 जुलैला पत्र आले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

19 जुलैला एकनाथ शिंदे गटाचे खासदार हे लोकसभा अध्यक्षांना भेटले. मात्र त्यांनी हा निर्णय 18 जुलैलाच घेतल्याचे लोकसभा कामकाजाच्या कागदपत्रांवरून दिसून येत आहे. लोकसभा सचिवालयाने काढलेल्या पत्रात लिहिले आहे की, 19 जुलैला पत्र काढले आहे मात्र त्याची अंमलबजावणी 18 जुलैपासूनच दाखविली आहे. हे लोकसभा सचिवालयाचे कामकाज कोणत्या नियमात झाले याचे आम्हाला आकलन झाले नाही. पक्षपातीपणा झाल्याचे शिवसेना नेत्यांना आता वाटू लागले आहे, असा आरोपही त्यांनी केला.

Vinayak Raut
शिवसेना सोडायची तर मर्दासारखी सोडा, रडून सोडू नका

या संदर्भात लोकसभा अध्यक्षांना आम्ही लेखी विचारणा करणार आहोत. सचिवालयाचा निर्णय आम्हाला योग्य वाटत नाही. गटनेते निवडण्याचे अधिकार पक्ष प्रमुखाला आहे. उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे प्रमुख आहेत व राहणार आहेत. त्यादृष्टीने सर्वोच्च न्यायालयात याचिका सुरू आहे. असे असताना घाई-घाईत हा निर्णय घेण्यात आला. त्यावर योग्यती कायदेशीर चर्चा होणे अपेक्षित होते. आमच्या तीनही पत्रांना उत्तर न देता एकतर्फी निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णया विरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com