शिवसेना निर्णायक टप्प्यावर; संजय राऊतांची राहूल- प्रियंकासोबत दिल्लीत खलबतं

आगामी पाच राज्यांतील निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची
Sanjay Raut -Rahul Gandhi- Priyanka Gandhi
Sanjay Raut -Rahul Gandhi- Priyanka Gandhi

नवी दिल्ली : आगामी पाच राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (Shivsena) निर्णायक टप्प्यावर आली‌ आहे. भाजपची साथ सोडल्यावर आता शिवसेना संयुक्त पुरोगामी आघाडीमध्ये ( congress) सहभागी होण्याच्या वाटेवर चालू लागल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

अशातच शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) उद्या (७ डिसेंबर) कॉंग्रेस खासदार राहूल गांधी (Rahul Gandhi) आणि परवा (८ डिसेंबर) कॉंग्रसेच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वाड्रा (priyanka gandhi-vadra) यांची भेट घेणार आहेत. शिवसेना यूपीएमध्ये सहभागी होण्याच्या हालचाली वाढल्या असून, शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पाठोपाठ काँग्रेसशी जवळीक करू लागल्याचेही समोर आले आहे. पाच राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

Sanjay Raut -Rahul Gandhi- Priyanka Gandhi
पक्षाने प्रदेशाध्यक्षपद दिले आता शेख गावची नगरपंचायत ताब्यात घेणार का?

दरम्यान, गेल्या आठवड्यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी त्यांनी कॉंग्रेसला वगळून देशात नवी आघाडी बनवण्यासाठी भूमिका मांडली होती. तर तृणमूल काँग्रेस व इतर काही राजकीय पक्षांकडून काँग्रेसवर युपीए आघाडीच्या मुद्यावरून सातत्याने टीकाही करत होते. मात्र, शिवसेनेने मुखपत्र 'सामना'च्या अग्रलेखातून युपीए आघाडीचे समर्थन देत कॉंग्रेसशिवाय नवी आघाडी शक्य नसल्याची ठाम भूमिका घेतली. त्यानंतर आता संजय राऊत हे राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची भेट घेणार आहेत.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान संजय राऊत यांनी दिल्लीत राहुल गांधी यांचीही भेट घेतली होती. त्यानंतर संजय राऊत यांच्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वासोबतही अगदी सहजतेनं आणि वारंवारपणे भेटी होत आहेत. आगामी निवडणूकांच्या दृष्टीने उत्तर प्रदेश हे भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचं राज्य मानलं जाते. युपीमध्ये शिवसेनेची फारशी ताकद नसली तरी शिवसेना या निवडणूकीत कॉंग्रेसला साथ देणार का हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. युपीच्या या निवडणुकीत भाजप हिंदुत्वाचा मुद्द्यावर भाजपचा प्रतिवाद करण्यासाठी शिवसेनेची कॉंग्रेसला मोठी मदत होऊ शकते, असा अंदाज बांधला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com