अमित शहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला लागणार लॉटरी; मिळणार १३ मंत्रीपदे?

Eknath Shinde| Devendra Fadanvis| मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दिल्लीत गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली
अमित शहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला लागणार लॉटरी; मिळणार १३ मंत्रीपदे?

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी रात्री त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. रात्री अडीच वाजेपर्यंत झालेल्या या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदेंनी आपल्या गटासाठी आठ कॅबिनेट आणि पाच राज्यमंत्रिपदांची मागणी केल्याचीही माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिमंडळातील एकूण ४३ मंत्र्यांपैकी ८ कॅबिनेट आणि पाच राज्यमंत्रिपदांची मागणी केली. तर राहिलेली २९ मंत्रिपदे भाजपने घ्यावीत, असा प्रस्ताव शिंदे गटाने दिला आहे. अमित शहांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदे हे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतील. तसेच भाजपचेअध्यक्ष जे. पी नड्डा आणि मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनाही भेटणार आहेत. सायंकाळी ते खास विमानाने पुण्याला दाखल होतील. पुण्यातूनच एकनाथ शिंदे रविवारी पहाटे पंढरपूरला जातील आणि आषाढी एकादशीनिमित्त शासकीय पूजा करतील.

अमित शहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला लागणार लॉटरी; मिळणार १३ मंत्रीपदे?
थोडं थांबा, गेलेले आमदार पुन्हा शिवसेनेत परत येतील?

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून खातेवाटप केले जाऊ शकते. अशात महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी शिंदे फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यामुळे शिंदे यांच्या मंत्रिमंडळात कोणत्या नेत्यांचा समावेश असेल, आणि भाजपाला कोणती खाती मिळतील, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

दरम्यान, अमित शहा यांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी या भेटीचे काही फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. ''मुख्यमंत्री या नात्याने पदभार स्विकारल्यानंतर आज उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दिल्ली येथे देशाचे गृहमंत्री श्री. अमित शहा यांची भेट घेतली. यासमयी त्यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी लागेल ती मदत केंद्र सरकार नक्कीच करेल असे मला आश्वस्त केले.'' असेही त्यांनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com