शिंदे गटाच्या खासदारांचे मोठे डावपेच; शिवसेना धोक्यात?

Eknath Shinde|Shivsena|Uddhav Thackeray : आमचा गट हाच खरी शिवसेना असून लोकसभेत आम्हाला वेगळा गट म्हणून मान्यता मिळावी, अशी मागणी बंंडखोर खासदारांकडून करण्यात आली आहे.
Eknath Shinde Group MPs Latest News
Eknath Shinde Group MPs Latest News Sarkarnama

नवी दिल्ली : आमचा गट हाच खरी शिवसेना (Shivsena) असून लोकसभेत आम्हाला वेगळा गट म्हणून मान्यता मिळावी, अशी मागणी करणारे पत्र एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाच्या १२ खासदारांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला (OM Birla) यांना लिहीले आहे. मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह हे १२ खासदार उद्या (ता.१९) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेणार असल्याचीही माहिती मिळाली आहे. (Eknath Shinde Group MPs Latest)

Eknath Shinde Group MPs Latest News
पक्षावर दावा करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची वर्षभरापूर्वीच हकालपट्टी : रासपचं स्पष्टीकरण

शिवसेनेत राष्ट्रीय पातळीवर उभी फूट पडण्याचा अखेरचा अध्याय सुरू झाला असून संसदेतील २१ पैकी १२ ते १४ खासदार आमच्या बाजूने आहेत, असे या खासदारांच्या वतीने सांगितले जाते. मुख्यमंत्री शिंदे आज रात्री पुन्हा दिल्लीत दाखल होत आहेत. ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या २० तारखेला शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीबाबत अॅडव्होकेट जनरल मुकूल रोहतगी व गृहमंत्री अमित शहा आदींशी चर्चा करतील.

Eknath Shinde Group MPs Latest News
राष्ट्रवादीचा प्रचार करण्यास सांगितल्याचे न पटल्यानेच शिवसेना सोडली : आढळराव

शिंदे मंत्रीमंडळाचा विस्तार न्यायालयीन सुनावणीनंतरच करण्याकडे भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाचा कल आहे व त्याबाबतही शहा व भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याशी मुख्यमंत्री व फडणवीस चर्चा करू शकतात. त्यानंतर उद्या या १२ खासदारांसह मुख्यमंत्री शिंदे पंतप्रधानांनाही भेटण्याची शक्यता आहे. या खआसदारांनी उद्या रीतसर पत्र दिल्यावर बहुमताचा कल पाहून लोकसभा सभापती याच गटाला मान्यता देतील व त्यांची आसन व्यवस्था (डिव्हीजन क्रमांक) या आठवड्यातच बदलेलं असाही विश्वास हे खासदार व्यक्त करत आहेत.

Eknath Shinde Group MPs Latest News
पक्षावर दावा करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची वर्षभरापूर्वीच हकालपट्टी : रासपचं स्पष्टीकरण

शिंदे गटाच्या एका खासदाराने बिर्ला यांना देण्यात येणाऱया या पत्राबाबतची माहिती दिली. त्यानुसार या पत्रात लोकसभा सभापती बिर्ला यांच्याकडे पुढील ३ प्रमुख मागण्या या १२ खासदारांनी पत्राद्वारे केल्या आहेत. यावर डॅा. श्रीकांत शिंदे, श्रीरंग बारणे, धैर्यशील माने आदी १२ खासदारांनी स्वाक्षऱया केल्या आहेत. १) आम्हीच अधिकृत शिवसेना असून आमच्याकडे संसदीय बहुमत आहे. २) त्यामुळे लोकसभेत वेगळा गट म्हणून आम्हाला मान्यता मिळावी. ३) भावना गवळी हे शिवसेनेचे लोकसभेतील प्रतोद (चीफ व्हीप) असतील. शिंदे गटाची आज संध्याकाळी जी बैठक झाली तीत हे १२ खासदारही ऑनलाईन सहभागी झाले होते. यातील श्रीकांत शिंदेसह किमान ९ खासदार बारणेंच्या निवासस्थानातून ऑनलाईन बैठकीत सहभागी झाले होते. भावना गवळी या प्रवासात होत्या व तेथूनच त्या बैठकीत सहभागी झाल्या होत्या.

Eknath Shinde Group MPs Latest News
कालपर्यंत ठाकरेंशी एकनिष्ठ असलेले बारणे आज शिंदेंच्या गोटात

दरम्यान, या १२ खासदारांना शिंदे गटाला पाठिंबा द्यायचा असल्यास संसदेत वेगळा गट करून संसदेत तशी नोंद करावी लागेल, हा पहिला पर्याय 14 खासदारांकडे असेल. मात्र शिवसेनेत राहिले तरी त्यांना पक्षाचा व्हीप लागू होऊ शकतो. त्यामुळेच या खासदारांनी आपल्याच गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता द्यावी, असे बिर्ला यांना लिहीलेल्या पत्रात म्हटले आहे. गजानन कीर्तिकर, अरविंद सावंत, विनायक राऊत आणि राजन विचारे वगळून इतर सर्व खासदार शिंदे गटात सामील झाल्याचे या पत्रावरून दिसते. लोकसभेतील शिवसेनेचे प्रतोद असलेले विचारे हेही या खासदारांना साथ देऊ शकतात असाही विश्वास या खासदारांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in