पॉर्न फिल्म प्रकरणात शिल्पा शेट्टीला क्लिन चिट नाहीच!

मुंबई पोलिसांकडून शिल्पा शेट्टीचीही चौकशी कऱण्यात आलेली आहे.
Shilpa Shetty has not been given clean chit yet says Mumbai Police
Shilpa Shetty has not been given clean chit yet says Mumbai Police

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. पॉर्न फिल्मची निर्मिती केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांकडून शिल्पा शेट्टीचीही चौकशी कऱण्यात आलेली आहे. तिला या प्रकरणात क्लिन चिट दिलेली नाही, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. (Shilpa Shetty has not been given clean chit yet says Mumbai Police)

राज कुंद्रा याच्या विरोधात पुरेसे पुरावे असल्याचा दावा पोलिसांनी केली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू असून, या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढण्याच्या दिशेने पोलिसांनी पावले टाकली आहेत. पॉर्न व्हिडीओ बनवून ते ऑनलाईन अपलोड करणा-या रॅकेट प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने राज कुंद्रा याला अटक केली. त्याला तीन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणात तो मुख्य सूत्रधार आहे.

या प्रकरणी राज कुंद्राची पत्नी शिल्पा शेट्टी हिचा सहभाग होता का याचाही तपास पोलीस करीत आहेत. पोलिसांनी तिचा जबाब यापूर्वीच नोंदवला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिल्पा शेट्टी यांना अद्याप क्लिन चिट दिलेली नाही. सर्व शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत. फॉरेन्सिक ऑडिटर्सची नियुक्ती करण्यात आली असून ते या प्रकरणाशी संबंधित सर्व बँक खात्यांमध्ये झालेल्या व्यवहारांची तपासणी करत आहेत. 

या प्रकरणात राज कुंद्राचा मेव्हणा प्रदीप बक्षी याचा केवळ चेहरा समोर केला जात होता, असा संशय पोलिसांना आहे. हॉटशॉट्सचे सर्व काम कुंद्रा स्वत:पाहत होता. त्याला अटक केल्यानंतर काही पिडीत पोलिसांकडे आले आणि त्यांनी जबाब दिल्याचे पोलिसांनी सांगितले. अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिला साक्षीदार म्हणून जबाब देण्यासाठी बोलवण्यात आल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. 

दरम्यान, कुंद्रा याच्यानंतर नेरुळमधून रायन थार्प याला अटक करण्यात आली आहे. कुंद्राने एका कंपनीच्या माध्यमातून 30 ते 40 अॅप्सची निर्मिती केलेली आहे. या कंपन्यांवर काही दिवस तो स्वतः संचालक राहायचा आणि नंतर राजीनामा देऊन विश्वासातील व्यक्तीला तिथे नेमायचा.  त्याने ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या शेकडो अश्लील व्हिडिओंचा डेटा मुंबई पोलिसांच्या हाती लागला आहे. 

चित्रपटाच्या शूटिंगच्या नावाखाली मढ बेटावरील खासगी बंगल्यांमध्ये वेश्याव्यवसाय आणि पॉर्न व्हिडीओचे शूटिंग होत असल्याची माहिती पोलिसांना फेब्रुवारीमध्ये मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी त्यावेळी या बंगल्यांवर छापे टाकले होते. तरुण मुलींना चित्रपटात काम देण्याचे आमिष दाखवून काही टोळ्या अश्लील व्हिडीओमध्ये काम करायला लावत होत्या. या छाप्यादरम्यान पोलिसांनी दोन मुलींची सुटका केली होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com