इम्रान यांचे अनेक कारनामे समोर ; पंतप्रधान शाहबाज यांच्याकडून अनेक गुपितं उघड

इम्रान यांनी दुबईत 14 कोटींच्या सरकारी भेटवस्तू विकल्या असल्याचा आरोप शाहबाज यांनी केला आहे.
Imran Khan, Shehbaz Sharif
Imran Khan, Shehbaz Sharifsarkarnama

इस्लामाबाद : शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) पाकिस्तानचे नवे पंतप्रधान बनले आहेत. नवीन पंतप्रधान निवडीपूर्वी इम्रान खान (Imran Khan)यांनी ‘चोरांसोबत’ बसणार नाही असे सांगून नॅशनल असेंब्लीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. तेव्हा इम्रान खान म्हणाले होते, ''ज्याच्यावर कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचाराचा खटला आहे. त्यांना पंतप्रधानपदी निवडून आणणे याहून मोठी देशाची नामुष्की असू शकत नाही,'' त्याला शाहबाज शरीफ यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

आता खान यांची खुर्ची गेल्याने त्यांचे कारनामे चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. शाहबाज इस्लामाबादमध्ये एका रोजा इफ्तार पार्टीत सहभागी झाले होते. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. इम्रान यांनी दुबईत 14 कोटींच्या सरकारी भेटवस्तू विकल्या असल्याचा आरोप शाहबाज यांनी केला आहे. इम्रान यांचे अजून काही गुपिते उघड करणार असल्याचे शाहबाज यांनी सांगितले.

Imran Khan, Shehbaz Sharif
शिवसेना-मनसे वाद पेटला : 'काल, आज आणि उद्या' पुन्हा व्हायरल

''विकल्या गेलेल्या भेटवस्तूंमध्ये हिऱ्यांचे दागिने, बांगड्या आणि मौल्यवान घड्याळांचा समावेश आहे. एकदा त्यांनाही एक मौल्यवान मनगटी घड्याळ भेट म्हणून मिळाले होते, पण ते त्यांनी सरकारी तिजोरीत जमा केले होते,'' असे शाहबाज यांनी सांगितले. ''इम्रान खानने दुबईत 14 कोटी रुपयांच्या भेटवस्तू विकल्या आहेत. सरकारकडे पुरावे आहेत," असा गैाप्यस्फोट शाहबाज यांनी केला आहे.

Imran Khan, Shehbaz Sharif
मुंबईत दंगली घडाव्यात हा भाजपचा उद्देश होता का ? राष्ट्रवादीचा सवाल

अनेक पाकिस्तानी माध्यमांनी सरकारी तिजोरीतील (तोशाखाना) काही मौल्यवान वस्तू विकल्याचा दावा गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पहिल्यांदाच केला होता. इम्रान यांनी कधीही शाहबाज शरीफ यांच्याशी हस्तांदोलन केले नाही, कारण इम्रान हे शरीफ कुटुंबियांना चोर, डाकू आणि दरोडेखोर समजतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in