अखेर ठरले; शशी थरुर काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार

शशी थरुर येत्या ३० सप्टेंबर रोजी निवडणूक अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Shashi Tharoor
Shashi Tharoorsarkarnama

नवी दिल्ली : काँग्रेस (Congress) अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेसचे खासदार शशी थरुर (Shashi Tharoor) आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांच्या नावांना मंजुरी देण्यात आली आहे. दरम्यान, शशी थरुर येत्या ३० सप्टेंबर रोजी निवडणूक अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, थरुर यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी नामनिर्देशनपत्रांचे ५ संच मागवले आहेत. तसेच, ते विविध राज्यांच्या प्रतिनिधींच्या संपर्कात आहेत. २२ सप्टेंबरला अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली होती. २४ सप्टेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अंतिम तारीख ८ ऑक्टोबर ठेवण्यात आली. तर १७ ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

Shashi Tharoor
दसरा मेळाव्यात सोनिया गांधी, पवारांचे विचार मांडू नका ;गुलाबराव पाटलांचा टोला

काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होण्याची ही चौथी वेळ आहे. काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष हा गांधी घराण्यातील नसणार आहे. २४ वर्षांनतर गांधी कुटुंबाऐवजी इतर व्यक्तीकडे काँग्रेसची सूत्रे जाणार आहे. या आधी शेवटचे बिगर गांधी अध्यक्ष सीताराम केसरी होते. त्यांच्यानंतर सोनिया गांधी (Sonia Gandhi) पक्षाच्या अध्यक्षा झाल्या होत्या.

Shashi Tharoor
Narendra Modi : चंदिगढ विमानतळाला आता भगत सिंगांचे नाव : पंतप्रधानांची घोषणा!

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि शशी थरुर यांच्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे. पण, आणखी काही उमेदवार रिंगणात उतरण्याची शक्याताही नाकारता येत नाही. यावेळी काँग्रेस पक्षातील 9 हजाराहून अधिक प्रतिनिधी मतदान करणार आहेत. काँग्रेस म्हणते की देशातील एकमेव असा पक्ष आहे ज्याचा अध्यक्ष लोकशाही पद्धतीने निवडला जातो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in