Shashi Tharoor:''...म्हणून २०२४ ला भाजप सत्ता स्थापन करु शकणार नाही!''; शशी थरुर असं का म्हणाले?

Shashi Tharoor : भाजपाला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत २०१९ सारखी कामगिरी करता येणार नाही...
Shashi Tharoor, Narendra Modi
Shashi Tharoor, Narendra ModiSarkarnama

Shashi Tharoor News : भाजपनं आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरु केली आहे. तसेच भाजपच्या वरिष्ठ नेतेमंडळींकडून २०२४ ला ४०० हून अधिक जागा निवडून येणार असल्याचा दावा देखील करण्यात येतो. याचवेळी मोदी सरकारनं आपल्या मंत्र्यांना विविध राज्यांची जबाबदारी दिली असून ज्या जागांवर भाजपचा पराभव झालेला आहे त्यावर जास्त लक्ष केंद्रीत केलं आहे. महाराष्ट्रातही मिशन ४५ चा नारा दिला आहे. मात्र, काँग्रेसच्या बड्या नेत्यानं २०२४ ला मोदी सरकारचा पराभव होऊ शकतो असा दावा केला आहे.

काँग्रेसचे वरिष्ठ नेते व खासदार शशी थरूर केरळ साहित्य संमेलनाला उपस्थित होते. यावेळी थरुर यांनी लोकसभा निवडणुकीवर मोठं भाकित केलं आहे. थरुर म्हणाले, भाजपाला (Bjp) २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत २०१९ सारखी कामगिरी करता येणार नाही. त्यांचा ५० जागांवर पराभव होईल. भाजपानं अगोदरच काही राज्यांमधली सत्ता गमावली आहे. त्यामुळं २०२४ ला त्यांना बहुमत मिळणं अवघड असून भाजपाला कदाचित सरकारही स्थापन करता येणार नाही असं मोठं विधान शशी थरुर(Shashi Tharoor) यांनी केलं आहे.

Shashi Tharoor, Narendra Modi
Urfi Javed-Chitra Wagh Controversy: 'जा आधी हिंदू संस्कृती शिकून घ्या' ; उर्फीनं वाघांना डिवचलं...

थरुर म्हणाले, भाजपानं २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत खूप चांगली कामगिरी केली होती. हरियाणा, गुजरात, राजस्थान, बिहार, मध्य प्रदेश, आणि महाराष्ट्रातही भाजपची जादू चाललेली होती. पश्चिम बंगालमध्येही भाजपानं १८ जागा जिंकल्या होत्या.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी पुलवामा येथील सैनिकांच्या हत्येचं प्रकरण घडलं होतं. त्यानंतर मोदी सरकारने एअर स्ट्राईक करत पाकिस्तानला उत्तर दिलं होतं. यामुळे भाजपाला तरूणांचीही मतं मिळाली. ५४३ पैकी ३०३ जागा जिंकत भाजपनं जोरदार मुसंडी मारली होती. त्यावेळी काँग्रेसला ५२ जागांवर समाधान मानावं लागलं होतं

Shashi Tharoor, Narendra Modi
Ganga Vilas River Cruise News : मोदींच्या गंगा विलास रिव्हर क्रूझला 'या' राज्यांची आडकाठी

लोकशाहीपुढं घराणेशाहीचं सर्वात मोठं आव्हान

भाजपाकडून सातत्याने काँग्रेस(Congress) आणि गांधी कुटुंबावर घराणेशाहीचा आरोप करत जोरदार टीका केली जाते. यावर आता काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी भाजपाला प्रत्युत्तर दिलं आहे. देशाच्या लोकशाहीपुढे घराणेशाही हे सर्वात मोठे आव्हान आहे. जे लोक काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करतात त्यांनी आधी स्वतःच्या घरात वाकून बघावं मग दुसऱ्यांना नावं ठेवावी असंही शशी थरूर यांनी खोचकपणे विचारलं आहे. सगळ्याच पक्षांमध्ये घराणेशाही आहे असा टोलाही थरूर यांनी यावेळी लगावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in