समविचारी पक्षांना बरोबर घेतोय पण आमचे घरही आम्हाला मजबूत करायचं आहे

दिल्ली विधानसभेचे माजी अध्यक्ष योगानंद शास्त्री (Yoganand Shastri) यांनी बुधवारी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
समविचारी पक्षांना बरोबर घेतोय पण आमचे घरही आम्हाला मजबूत करायचं आहे
Sharad Pawar, NCP President.Sarkarnama

नवी दिल्ली : दिल्लीतील राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) ताकद आणखी वाढली आहे. दिल्ली विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि कधीकाळचे दिल्ली काँग्रेसचे दिग्गज नेते योगानंद शास्त्री (Yoganand Shastri) यांनी बुधवारी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. शास्त्री यांनी मागील वर्षीच काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. दिल्ली काँग्रेसचे माजी प्रभारी पी. सी. चाको यांनीही काही महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. या सगळ्या घडामोडींवर समविचारी पक्षांना बरोबर घेतोय पण आमचे घरही आम्हाला मजबूत करायचं असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केले.

यावेळी शरद पवार यांनी महाराष्ट्रामधीलही विविध गोष्टींवर भाष्य केले. ते म्हणाले, दिल्लीत राष्ट्रवादीला कष्ट करण्याची गरज आहे. देशाच्या राजधानीत राष्ट्रीय पक्षाचे काम विशिष्ट पद्धतीने झाले पाहिजे. त्यामुळे समविचारी लोकांना बरोबर घेत आहे. पण याबरोबर आमचे घरही आम्हाला मजबूत करावे लागेल. गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरू होती. दिल्लीतील जबाबदारी त्यांनी घ्यावी, अशी सूचना त्यांना केली होती, त्यांचा त्यांनी स्वीकार केला. त्यांचे कार्यकर्तेही पक्षात आले आहेत. देशात समविचारी पक्षांनी राष्ट्रहितासाठी एकत्र आले पाहिजे. त्यासाठी प्रयत्न करत आहे. सांप्रदायिक शक्तींना पर्याय दिला पाहिजे. भाजपला रोखण्याचा प्रयत्न आम्ही करत आहे असेही पवार म्हणाले.

Sharad Pawar, NCP President.
शरद पवार म्हणतात आमचं ठरलंय! आता भाजपने दिवस मोजावेत

पवार यांनी यावेळी नवाब मलिक यांच्यावरही भाष्य केले. क्रूझ ड्रग्ज प्रकरणावरून राज्यात वादळ उठलं आहे. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिकांकडून दररोज आरोप केले जात आहे. पवारांनी मलिकांच्या या भूमिकेचे समर्थन केले आहे. वानखेडे हे अधिकारांचा गैरवापर करत असल्याचे मलिक सांगत आहेत. त्यामुळे या प्रकरणात केंद्राने लक्ष घालायला हवे, अशी अपेक्षा पवारांनी व्यक्त केली.

Sharad Pawar, NCP President.
त्रिपुरा कथित घटनेबाबत शरद पवार म्हणाले... ;पाहा व्हिडिओ

सोबतच मागील काही महिन्यांपासून महाविकास आघाडीतील नेत्यांना जेरीस आणणाऱ्या केंद्रीय अन्वेषन ब्युरो (CBI) व सक्तवसुली संचालनालयाच्या (ED) प्रमुखांचा कार्यकाळ वाढवण्यात आला आहे. मोदी सरकारने रविवारी याबाबतचा अध्यादेश काढला आहे. यावर पवार म्हणाले, विरोधी पक्षांना या निवडीत स्थान असते. ते डवलले आहे. त्याला विरोध करण्यासाठी यासंबंधी संसदेच्या अधिवेशनावेळी सर्व विरोधी पक्ष रणनिती ठरवतील.

शरद पवार यांच्याकडून उद्धव ठाकरे यांचे कौतुक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना राज्यात केअर टेकर सीएमची चर्चा रंगली होती. सोबतच भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पार्टटाईम मुख्यमंत्री म्हटले आहे. त्याचा समाचार घेताना पवार यांनी या वक्तव्यात दम नसल्याचे म्हटले. मुख्यमंत्री हा मुख्यमंत्री असतो. उद्धव ठाकरे यांच्याकडे जबाबदारी दिली आहे, जनतेने त्यांचे स्वागतही केले आहे. ठाकरे यांच्यावर ऑपरेशनचं संकट आले होते पण तरीही ते काम सुरू करत आहेत, असे म्हणत शरद पवार यांच्याकडून उद्धव ठाकरे यांचे कौतुक करण्यात आले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in