मोठी बातमी : राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी पुन्हा शरद पवार, एकमताने ठराव मंजूर

राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) कार्यकारीनीची बैठक दिल्लीमध्ये सुरु आहे
Sharad Pawar
Sharad Pawarsarkarnama

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अध्यक्षपदी शरद पवार (Sharad Pawar) यांची पुन्हा बिनविरोध निवड झाली आहे. राष्ट्रवादीच्या कार्य समितीत एकमताने असा ठराव मंजूर झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारणी अधिवेशन दिल्लीत ताल कटोरा स्टेडियमध्ये सुरु आहे. या राष्ट्रीय कार्यसमितीच्या बैठकीत पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली.

Sharad Pawar
Sunil Raut : दिल्लीत राजकीय भेटीसाठी आलो नाही ; राऊतांचा दावा

राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे. वरपे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, आज कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया येथे पार पडलेल्या राष्ट्रीय कार्यसमितीच्या बैठकीत शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. शरद पवार यांच्या नेतृत्वात या देशामध्ये पुरोगामी, धर्मनिरपेक्ष सर्वसमावेशक विचारांचा प्रसार करू व भारतीय लोकशाही बळकट करु असे ट्वीट वरपे यांनी केले आहे.

Sharad Pawar
भाजपला भारत जोडोची धास्ती; 'आयटीसेल' विलक्षण सक्रिय

राष्ट्रवादीच्या दिल्लीत पार पडलेल्या राष्ट्रीय कार्यसमितीच्या बैठकीत पवार यांची सर्वानुमते अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. या बैठकीला शरद पवार यांच्यासह विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे यांच्यासह पक्षाचे आमदार, खासदार आणि सर्व ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in