NCP : शरद पवारांचे मोदी सरकारला खुले आव्हान ; दिल्लीसमोर कधीही झुकणार नाही !

Sharad Pawar : ईडी, सीबीआय कारवाया केल्या जात आहेत. त्या विरोधात लढायला आम्ही तयार आहोत.
sharad pawar new delhi ncp conference
sharad pawar new delhi ncp conference Sarkarnama

नवी दिल्ली : राष्ट्रवादी कॉग्रेसच्या अधिवेशनास (NCP Adhiveshan) आज (रविवार) दिल्लीत सुरवात झाली. या अधिवेशनास पक्षाचे आमदार, खासदार, पदाधिकारी उपस्थित आहेत. दिल्लीतील अधिवेशनात राष्ट्रवादी कोणती रणनीती आखणार याकडे सगळ्याचे लक्ष आहे. राजधानी दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडियमवर राष्ट्रवादीचं अधिवेशन होत आहे.

"ईडी, सीबीआय कारवाया केल्या जात आहेत. त्या विरोधात लढायला आम्ही तयार आहोत. सरकारच्या निष्क्रीयतेच्या विरोधात लोकांनी ताकद दाखवून द्यायला पाहिजे," असा हल्लाबोल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारवर केला. ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, अजित पवार, सुनिल तटकरे, छगन भुजबळ, एकनाथ खडसे उपस्थित होते

छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर हे आमचे प्रेरणास्थान आहेत. शिवाजी महाराज हे कधीच दिल्लीसमोर झुकले नाहीत. बाजीराव पेशवे यांनी इथूनच दिल्लीला आव्हान दिले. पेशव्यांनी याच तालकटोरा स्टेडियममध्ये तळ ठोकला होता. असे म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट मोदी सरकारसमोर झुकणार नसल्याचा इशारा दिला आहे.

मोदी सरकारवर टीका करताना पवार म्हणाले, "काही सांप्रदायिक तत्व समाजात तेढ निर्माण करत आहेत. काही लोक शपथ घेतल्यानंतर मंदिर मशिदींचे मुद्दे काढून देशाला असुरक्षितता निर्माण करण्याचे आणि धोक्यात टाकण्याचे काम करत आहेत,"

sharad pawar new delhi ncp conference
MNS : शिवसेनेला सत्तेचा माज आलायं.., जे पेरलं तेच उगवतयं ; मनसेनं डिवचलं

"देशाच्या सीमा सुरक्षित नाहीत. पण मोदी म्हणतात की, कोणीही भारताच्या सीमेत घुसखोरी केली नाही. पण त्यांनी जुमला केलाय. चीनच्या आर्मीनं नवीन गाव बनवण्याचं काम केलं. पण ते स्वीकारण्यासाठी केंद्र सरकार तयार नाही. चीनचा सामना करण्यासाठी हे सरकार सक्षम नाही. शेजारी राष्ट्र पाकिस्तान श्रीलंका इथे हुकूमशाही पाहिली. धार्मिक तेढ पाहिला. तिथले संसदीय लोकशाही उद्धवस्थ झाली. आपण अद्याप या रस्त्याने कधी गेलो नाही. याचं कारण म्हणजे महात्मा गांधी नेहरू सरदार पटेल मौलाना आझाद यांच्या बलिदानामुळे शांतता नांदली,"असे पवार म्हणाले.

sharad pawar new delhi ncp conference
Thackeray vs. Shinde सत्तासंघर्षांत जयंत पाटलांनी केला मुख्यमंत्र्यांचा 'तो' फोटो शेअर ; चर्चांना उधाण

शेतक-यांना चिरडले

"आपल्या देशात ५६ टक्के लोकसंख्या कृषी क्षेत्राशी निगडीत आहे. केंद्राला बनवलेले ३ कायदे मागे घ्यावे लागले हे जगानं पाहिले. शेतकरी दिल्ली सीमेवर १ वर्ष बसले होते पण केंद्र सरकारनं दखल घेतली नाही. निर्दोष शेतक-यांना चिरडले गेले. यामुळे शेतक-यांच्या मनांत असंतोष निर्माण झाला आहे," असे पवार यांनी सांगितले. 

शेतक-यांच्या मनात असंतोष

पवार म्हणाले, "देशात महागाई वाढली आहे. ४१० रुपयांना मिळणारा गॅस १ हजार झाला.पेट्रोल डिझेलचे दर वाढले. रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या नाही. देशात ५६ टक्के लोकसंख्या कृषी क्षेत्राशी निगडीत आहे. केंद्राला बनवलेले ३ कायदे मागे घ्यावे लागले हे जगानं पाहिले. शेतकरी दिल्ली सीमेवर १ वर्ष बसले होते पण केंद्र सरकारनं दखल घेतली नाही. निर्दोष शेतक-यांना चिरडले गेले. यामुळे शेतक-यांच्या मनात असंतोष निर्माण झाला आहे,"

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपदी शरद पवार यांची फेरनिवड करण्यात आली आहे. शरद पवार यांना पुढील चार वर्षासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष करण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com