राम मंदिर ट्रस्टवर शंकराचार्य संतापले अन् म्हणाले, आधी चंपत रायना तेथून हाकला!

अयोध्येतील राम मंदिरासाठीच्या जमीन खरेदीतील गैरव्यवहारावरून देशभरातील राजकारण तापलं आहे.
shankaracharya swami swaroopanand sarswati slam ram mandir trust
shankaracharya swami swaroopanand sarswati slam ram mandir trust

नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिरासाठीच्या (Ram Mandir) जमीन खरेदीतील गैरव्यवहारावरून (Land Scam) देशभरातील राजकारण तापलं आहे. जमीन खरेदीत कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याचा खुलासा राम मंदिर ट्रस्टने (Ram Mandir Trust) केला आहे. यावर आता शंकराचार्य (Shankarcharya) स्वामी स्वरुपानंद सरस्वती हे संतापले असून, त्यांनी ट्रस्टला सुनावले आहे. 

राम मंदिर जमीन खरेदीवरच आरोप करण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. समाजवादी पक्षाचे नेते पवन पांडे आणि आम आदमी पक्षाचे (आप) खासदार संजय सिंग यांनी पत्रकार परिषदेत जमीन व्यवहाराची कागदपत्रे सादर करत भ्रष्टाचार झाल्याचे म्हटले आहे. त्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. ट्रस्टने आज यावर स्पष्टीकरण देत जमीन खरेदीमध्ये कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याचे म्हटले आहे. 

या मुद्द्यावर बोलताना शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी राम मंदिर ट्रस्टवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय हे बेजबाबदार असून, त्यांची तातडीने पदावरुन हकालपट्टी करावी. नरेंद्र मोदी सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भ्रष्टाचारी व्यक्तींना राम जन्मभूमी ट्रस्टमध्ये स्थान दिले आहे. अशा व्यक्तींना त्यांच्यावरील आरोपांनी काहीही फरक पडत नाही. 

अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणाशी देशभरातील कोट्यवधी हिंदूची आस्था जोडली गेली आहे. यासाठी जनतेने मोठ्या प्रमाणात पैसे दिले आहेत. राम मंदिरासाठी जमा झालेल्या वर्गणीतून आता महागड्या दराने जमीन खरेदी करण्यात येत आहे. यात ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांचाही समावेश आहे. जमीन गैरव्यवहाराचे आरोप खोडण्याऐवजी ते आमच्यावर गांधी हत्येचेही आरोप झाले, अशी बेताल विधाने करीत सुटले आहेत, असे शंकराचार्य म्हणाले.  

दरम्यान, ट्रस्टवरील आरोपांची केंद्र सरकारनेही दखल घेतली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल मागवण्यात आल्याचे समजते. पुढील वर्षी उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुका होत आहेत. या मुद्दावरून विरोधकांकडून भाजपला लक्ष्य केले जाऊ शकते. निवडणुकीत ही बाब अडचणीची ठरू शकते. त्यामुळं भाजपकडून आता यामध्ये लक्ष्य घालण्यात येत आहे. केंद्रीय नेतृत्वाकडून याची गांभीर्याने दखल घेण्यात आल्याचे समजते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी या प्रकरणाचा अहवाल मागविल्याचे समजते. मंदिर ट्स्टने देखील केंद्र सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला एक सविस्तर पत्र पाठवून गैरव्यवहार झाला नसल्याचा दावा केला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com