शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती महाराज यांचे निधन

स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी स्वातंत्र्याच्या लढाईत सहभाग घेतला होता. त्यामुळे त्यांना १५ महिने तुरुंगवासही झाला होता.
Swami Swaroopanand Saraswati Maharaj
Swami Swaroopanand Saraswati Maharaj Sarkarnama

भोपाळ : द्वारकापीठ आणि शारदापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती महाराज यांचे आज (ता. ११ सप्टेंबर) वयाच्या ९९ व्या वर्षी निधन झाले. मध्य प्रदेशातील (MP) नरसिंहपूर जिल्ह्यातील गोटेगावजवळील झोतेश्वर परमहंसी गंगा आश्रमात स्वामी स्वरूपानंद शंकराचार्यांनी आपला देहत्याग केला. (Shankaracharya Swami Swaroopanand Saraswati Maharaj passed away)

Swami Swaroopanand Saraswati Maharaj
अमित शहांच्या ‘त्या’ इशाऱ्यानंतर उद्धव ठाकरेंनी ‘यूपी’तील शिवसेना नेत्यांना लावले कामाला!

स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचा जन्म मध्यप्रदेश राज्यातील सिवनी जिल्ह्यातील जबलपूरजवळील दिघोरी गावात एका ब्राह्मण कुटुंबात झाला. आई-वडिलांनी त्यांचे नाव पोथीराम उपाध्याय ठेवले होते. वयाच्या ९ व्या वर्षी त्यांनी घर सोडले आणि धर्मप्रसाराच्या कामाला सुरुवात केली. यादरम्यान ते उत्तर प्रदेशातील काशीला पोहोचले. त्या ठिकाणी त्यांनी वेद-वेदांग आणि शास्त्रांचे शिक्षण घेतले.

स्वामी स्वरूपानंद सरस्वती हे १९४२ च्या या काळात वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी क्रांतिकारी संन्यासी म्हणून प्रसिद्ध झाले होते. कारण, त्यावेळी देशात इंग्रजांविरोधात स्वातंत्र्याची लढाई चालू होती. त्या लढाईत स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनीही सहभाग घेतला होता. स्वातंत्र्याच्या लढाईत भाग घेतल्याने त्यांना १५ महिने तुरुंगवासही झाला होता. राम मंदिर उभारणीच्या लढाईतही शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांचा सक्रीस सहभाग होता.

Swami Swaroopanand Saraswati Maharaj
तामीळनाडूच्या महिलांनी राहुल गांधींसमोर ठेवला लग्नाचा प्रस्ताव...

असं म्हटलं जातं की १३०० वर्षांपूर्वी आदिगुरू भगवान शंकराचार्यांनी हिंदूंना संघटित करण्यासाठी, धर्माचे पालन करण्यासाठी आणि धर्माच्या उन्नतीसाठी देशभरात चार धार्मिक मठ बांधले होते. त्या चार मठांपैकी एकाचे शंकराचार्य हे स्वामी स्वरूपानंद सरस्वती होते. शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांना काँग्रेसचे अनेक नेतेही मानत होते. स्वरूपानंद सरस्वती हे शिर्डीच्या साईबाबांच्या पूजेच्या विरोधात होते. साईबाबा हे हिंदू धर्माचे नाहीत, त्यामुळे हिंदूंनी साईबाबांची पूजा करू नये, असे आवाहन ते कायम करायचे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in