पंतप्रधान मोदींच्या नावाने असलेल्या स्टेडियमचंही नाव बदलणार?

आता मोदींच्या नावाने असलेल्या मोटेरातील स्टेडिअमच्या नामकरणाची मागणी करण्यात आली असून, यावर ते काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.
shankar singh vaghela demands ranaming of narendra modi stadium
shankar singh vaghela demands ranaming of narendra modi stadium

नवी दिल्ली : देशातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार असलेल्या राजीव गांधी (Rajiv Gandhi) खेल रत्न पुरस्काराचे (Khel Ratna Award) नामकरण करण्यात आले आहे. मेजर ध्यानचंद (Major Dhyanchand) यांच्या नावाने आता हा पुरस्कार ओळखला जाईल. यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi Stadium) यांच्या नावाने असलेल्या मोटेरातील स्टेडिअमच्या नामकरणाची मागणी करण्यात आली असून, यावर ते काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे. 

मोटेरातील सरदार पटेल स्टेडियमचे नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडियम करण्यात आले आहे. यावरुन मोठा गदारोळ उडाला होता. मोदींनी आज खेलरत्न पुरस्कारातून दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचे नाव हटवले. त्याजागी मेजर ध्यानचंद यांचे नाव दिले. आता मोदी यांच्या नावाने असलेल्या स्टेडियमच्या नामकरणाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. मोदींनी या स्टेडियमचे नामकरण सरदार पटेल स्टेडियम असे करावे, अशी मागणी होत आहे. 

याबद्दल गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नामकरण मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे केले आहे. आता त्यांनी नरेंद्र मोदी स्टेडियमला आधीचेच सरदार पटेल स्टेडियम असे नाव द्यावे.   

भारताच्या पुरुष हॉकी संघाला तब्बल 41 वर्षांनंतर ऑलिंपिकमध्ये पदक मिळाले आहे. याचबरोबर भारताच्या महिला हॉकी संघाने उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली होती. यामुळे भारताच्या महिला व पुरुष हॉकी संघाचे देशभरातून कौतुक होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेल रत्न पुरस्काराला असलेले दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचे नाव काढून टाकले आहे. त्याऐवजी हॉकीचे जादूगार या टोपणनावाने ओळखले जाणार महान हॉकी खेळाडू मेजर ध्यानचंद यांचे नाव दिले आहे.  

मोदींनी ट्विटरवर म्हटले आहे की, मेजर ध्यानचंद यांनी भारताला अनेक सन्मान मिळवून दिले. ते भारताच्या महान क्रीडापटूंपैकी एक आहेत. अनेकवेळा त्यांच्यामुळे भारताची मान गर्वाने उंचावली आहे. अनेक देशवासियांनी खेलरत्न पुरस्कार मेजर ध्यानचंद यांना समर्पित केला जावा, अशी मागणी केली होती. जनभावनेची कदर करुन आता खेलरत्न पुरस्काराचे नाव मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार करण्यात आले आहे. जय हिंद! 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com