हार्दिक पटेल यांनी काँग्रेस सोडण्यामागं भाजपचाच हात!

विधानसभा निवडणुकीआधी हार्दिक पटेल यांचा काँग्रेसचा धक्का
Hardik Patel, Hardik Patel News updates, Gujrat News Updates, Hardik Patel Latest News in Marathi
Hardik Patel, Hardik Patel News updates, Gujrat News Updates, Hardik Patel Latest News in MarathiSarkarnama

गांधीनगर : गुजरात (Gujarat) काँग्रेसचे (Congress) कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल (Hardik Patel) यांनी पक्षाला रामराम केला आहे. यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसला हा मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. पटेल हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. यातच पटेल यांनी काँग्रेस सोडण्यामागं भाजपचाच हात असल्याचा गौप्यस्फोट एका खासदारांनं केला आहे. यामुळं खळबळ उडाली आहे. (Hardik Patel Latest Marathi News)

माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेसचे खासदार शक्तिसिंह गोहिल यांनी हा दावा केला आहे. ते म्हणाले की, हार्दिक पटेल यांनी काँग्रेसवर केलेले आरोप हे पक्ष सोडणाऱ्या नेत्यानं केलेले हे आरोप नाहीत. हे सगळे भाजपने लिहून दिलेले आरोप आहेत. हा नेता केवळ ते मोठ्याने वाचून दाखवत आहे. भाजपने जर हे ठरवले नसते तर प्रत्येकाचे शब्द वेगळे असते. पक्षाच्या नेतृत्वाबद्दल बोलत असाल तर काही दिवसांपूर्वी राहुल गांधींसोबत तुम्ही मंचावर होतात. त्यांना भेटण्यापासून तुम्हाला कुणी थांबवलं होतं. आमच्या पक्षात अंतर्गत लोकशाही आहे. अंतर्गत लोकशाही आणि बेशिस्त यात धूसर रेषा आहे. भाजपमध्ये अंतर्गत लोकशाहीच नाही.

हार्दिक पटेल यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याचे ट्विट करीत जाहीर केले होते. ते म्हणाले होते की, आज मी मोठ्या धैर्याने काँग्रेस पक्षाच्या पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. मला खात्री आहे की माझ्या निर्णयाचे माझे सर्व सहकारी आणि गुजरातची जनता स्वागत करेल. मला विश्वास आहे की माझ्या या पावलानंतर भविष्यात गुजरातसाठी खरोखर सकारात्मक काम करू शकेन.

Hardik Patel, Hardik Patel News updates, Gujrat News Updates, Hardik Patel Latest News in Marathi
मोठी बातमी : कोणत्याही मंदिर-मशीद वादात यापुढं संघ उतरणार नाही

गुजरातमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) नुकतेच राज्यात दाखल झाले होते. हार्दिक पटेल हे पाटीदार समाजाचे ताकदवान नेते आहेत. ते नाराज असल्याने पक्षातील मतभेद उघड झाले होते. या पार्श्वभूमीवर खुद्द राहुल गांधी यांच्यासोबत हार्दिक पटेल मंचावर दिसले होते. त्यामुळे त्यांची नाराजी दूर झाल्याची चर्चा सुरू होती. प्रत्यक्षात राहुल गांधींनी पटेल यांना भेट देणे टाळले होते. तसेच, त्यांच्याशी चर्चाही केली नव्हती. त्यामुळे हार्दिक यांची नाराजी कायम होती.

Hardik Patel, Hardik Patel News updates, Gujrat News Updates, Hardik Patel Latest News in Marathi
राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यामुळं भाजपच्या अडचणी वाढणार?

काही दिवसांपूर्वी पटेल यांनी पक्षात दुर्लक्षित केले जात असल्याचा आरोप केला होता. नव्या नवऱ्याची नसबंदी केल्यासारखी माझी पक्षात अवस्था झाली आहे, असे वक्तव्य त्यांनी केलं होतं. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कार्यकारी अध्यक्षांनीच केलेल्या या आरोपांमुळे काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली होती. मात्र, काँग्रेस सोडण्याच्या चर्चेवर पटेल यांनी काँग्रेसमध्ये राहणार असल्याचे स्पष्ट केलं होतं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com