Wrestlers Protest at Delhi: ब्रिजभुषण यांनी श्वास तपासण्याच्या बहाण्याने... महिला खेळाडूंचा धक्कादायक आरोप

Wrestlers Protest in Delhi: गेल्या १४ दिवसांपासून जंतरमंतरवर महिला कुस्तीपटूं आंदोलन करत आहेत.
Wrestlers Protest at Delhi:
Wrestlers Protest at Delhi:Sarkarnama

Wrestlers Protest at Delhi : दिल्लीत जंतर-मंतरवर सुरु असलेल्या कुस्तीपटुंच्या आंदोलनाप्रकरणी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभुषण शरण सिंह (Brijbhushan Sharad Singh) यांच्यावर केलेल्या लैंगिक छळाच्या आरोपाप्रकरणी आज सात खेळाडूंचे जबाब नोंदवण्यात आले. विशेष म्हणजे वकिलांच्या उपस्थितीत हे जबाब नोंदवण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, जबाब नोंदवताना तक्रारकर्त्यांनी वेगवेगळ्या घटना सांगितल्या, पण यातील एकाही पैलवानाला विनयभंगाची तारीख आठवली नाही. (Seven women players filed statements against Brijbhushan, but...)

याच वेळी दोन महिला कुस्तीपटूंनी नाव न सांगण्याच्या अटीवर बृजभूषण शरण सिंह यांच्यावर धक्कादायक आरोप केल्याचही त्यांनी म्हटलं आहे. ब्रिजभुषणने आम्हाला अयोग्यरित्या स्पर्श करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोपही या महिला कुस्तीपटूंनी केला आहे. ब्रिजभुषणने श्वास तपासण्याच्या बहाण्याने आमच्या पोटाला आणि स्तनाला स्पर्श केल्याच आरोप त्यांनी केला आहे. सांगितले की, ब्रिजभूषण सिंगने त्यांचे मानसिक आणि शारीरिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. (Wrestlers Protest at Delhi)

Wrestlers Protest at Delhi:
Uddhav Thackeray : राज्य सरकारची खुर्ची डगमगायला लागली; बारसुतून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

यानंतर आता लवकरच ब्रिजभूषण यांचाही जबाब नोंदवण्यात येणार आहे. दरम्यान, गुरुवारी केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिल्लीच्या जंतरमंतरवर ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंची भेट घेतली होती. सरकारने खेळाडूंच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. आता निःपक्षपाती चौकशी करू द्या, तरच दूध का दूध आणि पानी का पानी होईल.दिल्लीत आंदोलन करणाऱ्या खेळाडूंच्या सर्व न्याय्य मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत, असं आश्वासन अनुराग ठाकूर यांनी दिलं होतं. तसेच, दिल्ली पोलीस निष्पक्ष तपास करत आहेत. दोषींवर नक्की कारवाई केली जाईल. त्यामुळे पैलवानांनी संप मागे घ्यावा असंही त्यांनी म्हटलं होतं. (Delhi News)

दरम्यान, (बुधवारी) मध्यरात्री पोलीस आणि पैलवान यांच्यात जोरदार शाब्दीक चकमक झाली. आंदोलन करणाऱ्या पैलावानांना पोलिसांनी धक्काबुक्की केली. यात दोन मल्ल जखमी झाले आहेत. महिला पैलवानांना पोलिसांनी शिवीगाळ करुन धक्काबुक्की केल्याचा आरोप पैलवान बजरंग पुनिया यांनी केला आहे. पाऊस असल्यामुळे आंदोलन करणाऱ्या पैलवानांनी फोल्डिंगचे बेड मागवले होते. हे बेड घेऊन येत असलेल्या आम आदमी पक्षाचे आमदार सोमनाथ भारती यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने वाद आणखी वाढला.

पोलिसांनी सोमनाथ भारती यांना अडवले. पा‌वसात गाद्या भिजल्याने बेड ठेवण्याची परवानगी पैलवानांनी मागितली होती.पोलिसांनी त्यांची मागणी फेटाळताच गोंधळास सुरुवात झाली. काही वेळाने सोमनाथ भारती यांना सोडून देण्यात आले.या सर्व गंभीर प्रकार होत असताना पैलवान विनेश फोगाट आणि साक्षी मलिक यांना रडू कोसळले. "आम्ही देशाचे नाव उज्ज्वल करणारे खेळाडू आहोत, पण आम्हाला अपराधी असल्यासारखी वागणूक देण्यात येत आहे," असे साक्षी मलिक म्हणाली.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in