दहा दिवसांपूर्वीच काँग्रेसला रामराम; कपिल सिब्बल यांनी फोडला बॉम्ब

काँग्रेसमधील नाराज नेत्यांच्या जी 23 गटातील प्रमुख नेते कपिल सिब्बल यांनी काँग्रेसला 16 मे रोजीच सोडचिट्ठी दिली आहे.
Kapil sibal quits Congress Latest Marathi News
Kapil sibal quits Congress Latest Marathi News Sarkarnama

लखनौ : काँग्रेसमधील नाराज नेत्यांच्या जी 23 गटातील प्रमुख नेते कपिल सिब्बल यांनी काँग्रेसला दहा दिवसांपूर्वीच सोडचिट्ठी दिली आहे. त्यांनी 16 मे रोजी पक्षाचा राजीनामा दिला असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. मागील अनेक दिवसांपासून ते पक्षावर नाराज होते. काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. (Kapil Sibal Latest Marathi News)

मागील काही महिन्यांपासून सिब्बल हे सातत्याने काँग्रेसमधील नेतृत्वावरून निशाणा साधत होते. राहुल गांधी व प्रियांका गांधींवर त्यांनी उघडपणे टीका केली होती. नुकत्याच उदयपूर येथे झालेल्या चिंतन शिबीरातही त्यांची अनुपस्थिती खटकली होती. पण आता त्यांनी काही दिवसांपूर्वीच राजीनामा दिल्याचे समोर आले आहे. याबाबतची माहिती त्यांनी उघड केली नव्हती. (Kapil sibal quits Congress)

Kapil sibal quits Congress Latest Marathi News
संजय पवारांना कोल्हापूरचेच महाडिक देणार टक्कर? राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भाजपची खेळी

कपिल सिब्बल यांनी एका मुलाखतीत गांधी कुटुंबावर निशाणा साधला होता. त्यांनी काँग्रेसचे नेतृत्व सोडत इतरांना संधी द्यायला हवी, असं स्पष्ट केलं होतं. राहुल गांधी हे पक्षाचे अध्यक्ष नसले तरी तेच निर्णय घेत असल्याची टीकाही सिब्बल यांनी केली आहे.

काँग्रेसमधील बैठकांनाही त्यांची उपस्थिती नव्हती. तसेच पक्षनेतृत्वाकडूनही त्यांना कोणत्याही कार्यक्रमांमध्ये सहभागी करून घेतले जात नव्हते. त्यामुळे सिब्बल हे काँग्रेस सोडणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून होती. पण याबाबत त्यांच्याकडून काही बोलले जात नव्हते.

Kapil sibal quits Congress Latest Marathi News
पंधरा दिवसातल्या घडामोडी नीट समजून घ्या; राऊतांनी संभाजीराजेंच्या समर्थकांचे आरोप फेटाळले

अखेर मंगळवारी त्यांनी माध्यमांशी बोलताना याबाबत गौप्यस्फोट केला. 16 मे रोजीच आपण काँग्रेसचा राजीनामा दिला असल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यामुळे सर्वांना धक्का बसला आहे. सिब्बल यांनी राज्यसभेसह लोकसभेतही काँग्रेसचं प्रतिनिधित्व केलं आहे. तसेच युपीए सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com