BJP News : काँग्रेसचे नेते ए.के. अँटनी यांचा मुलगा भाजपमध्ये

AK Antonys Son Anil Antony Joins BJP : अनिल अँटनी हे केरळ काँग्रेसचे सोशल मीडिया सेलचे प्रमुख होते.
AK Antonys Son Anil Antony Joins BJP
AK Antonys Son Anil Antony Joins BJPSarkarnama

Senior Congress Leader AK Antonys Son Anil Antony Joins BJP : काँग्रेस ज्येष्ठ नेते, माजी संरक्षणमंत्री ए.के. ॲंटनी यांचे चिंरजीव, केरळमधील काँग्रेसचे नेते अनिल अँटनी यांनी आज (गुरुवारी) भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बीबीसीवरील माहितीपटावर त्यांनी टीका केली होती. त्यानंतर त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती.

भाजप नेता पियुष गोयल, वी मुरलीधरन आणि केरळ भाजपचे प्रदेशाध्यक्ष के सुरेंद्रन यांच्या उपस्थित अनिल अँटनी यांनी एका कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचा राजीनामा देण्यापूर्वी अनिल अँटनी हे केरळ काँग्रेसचे सोशल मीडिया सेलचे प्रमुख होते.

AK Antonys Son Anil Antony Joins BJP
Roshani Shinde Attack Case : रोशनी शिंदे हल्ल्याप्रकरणी महिला आयोग आक्रमक ; पोलीस आयुक्तांना..

काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्यापूर्वी त्यांनी 2002 च्या गुजरात दंगली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील बीबीसी डॉक्युमेंट्रीवर "भारताच्या विरोधात पक्षपातीपणा" अशा शब्दात टीका केली होती. या माहितीपटावरुन काँग्रेसने मोदींवर हल्लाबोल केला होता. मोदी यांच्यावरील बीबीसी डॉक्युमेंट्रीच्या वादानंतर अनिल अँटनी यांनी जानेवारीमध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली.

AK Antonys Son Anil Antony Joins BJP
BJP foundation day : वाजपेयींच्या त्या भाषणांची आठवण करुन देत पवारांनी दिल्या भाजपला खोचक शुभेच्छा!

"अनिल अँटनी हे बहुआयामी व्यक्तीमत्व आहे, त्यांचे काम मी पाहिले, आहे. मी त्यांच्या कामाने प्रभावित झालो आहे," असे पियुष गोयल यांनी अनिल याच्या स्वागत कार्यक्रमात सांगितले.

"देशाच्या विकासाबाबत त्यांचा विचार हा मोदींच्या विचाराप्रमाणे आहे. आम्हाला विश्वास आहे की, ते भाजपमध्ये सक्रिय राहून दक्षिण भारतात भाजप वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहतील," असे पियुष गोयल म्हणाले. अनिल अँटनी यांचे वडील ए.के. ॲंटनी देशाचे संरक्षणमंत्री होते. ते काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीचे सदस्य आहेत. ते केरळ राज्याचे मुख्यमंत्री होते. काँग्रेसमधील मोठे नेते म्हणून त्यांची ओळख आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com