भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती कोरोना पॅाझिटिव्ह  - Senior BJP leader Uma Bharti Corona positive | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती कोरोना पॅाझिटिव्ह 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 27 सप्टेंबर 2020

भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांचा कोरोना अहवाल पॅाझिटिव्ह आला आहे.

नवी दिल्ली : भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांचा कोरोना अहवाल पॅाझिटिव्ह आला आहे. त्यांनी याबाबतची माहिती टि्वटवरून दिली आहे. त्यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे की मला तीन दिवसापासून ताप येत असल्याने मी प्रशासनाकडून माझी कोरोना चाचणी करून घेतली आहे. माझा कोरोना अहवाल पॅाझिटिव्ह आला आहे. 

उमा भारती यांनी ऋषिकेश आणि हरिद्वार परिसरातील एका ठिकाणी क्वारंटाइन झाल्या आहेत. त्यांनी याबाबत अनेक टि्वट केलं आहे. त्यात त्या म्हणतात की मी हिमालय यात्रेला गेले होते. माझी यात्रा समाप्त झाली आहे. या दरम्यान मी कोविडच्या सर्व उपाययोजना केल्या, सर्व नियम काटेकोरपणे पाळले, पण तरीही मला कोरोना झाला.

मी सध्या ऋषिकेश- हरिद्वार परिसरातील वंदेमातरम् कुंज येथे क्वारंटाइन आहे. चार दिवसानंतर मी पुन्हा कोरोनाची तपासणी करणार आहे. त्यानंतर डॅाक्टरांच्या सल्ल्यानंतर निर्णय घेणार आहे. माझ्या संपर्कातील नागरिकांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी, असे उमा भारती यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा :  माजी केंद्रीयमंत्री जसवंत सिंह यांचे निधन
 नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीयमंत्री जसवंत सिंह (वय 82) यांचे आज निधन झाले. गेल्या अनेक महिन्यांपासून ते आजारी होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सरंक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सरंक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांच्या निधनाची माहिती टि्वटव्दारे दिली आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी अनेक महत्वपू्र्ण विभागाची जबाबदारी सांभाळली होती. अर्थ, सरंक्षण आणि परराष्ट्रीय धोरण याबाबत देशाची भूमिका त्यांची जगासमोर मांडली. राजनाथ सिंह यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे की जसवंत सिंह यांनी राजस्थानमध्ये भाजपला मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले आहे. बैाध्दीक क्षमता आणि देशसेवेसाठी जयवंत सिंह कायम स्मरणात राहतील. 
 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख