BJP News : भावूक होत भाजपच्या 'या' बड्या नेत्याने घेतली राजकारणातून निवृत्ती

Politics : ''मी आता पुन्हा निवडणूक लढवणार नाही, मला...''
BJP News
BJP News Sarkarnama

BS Yediyurappa : भाजपचे ज्येष्ठ नेते बीएस येडियुरप्पा यांनी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यांनी घेतल्याल्या या निर्णयामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या विधानसभेत बुधवारी निरोपाचे भाषण केले.

''हे माझे निरोपाचे भाषण आहे. हा एक दुर्मिळ क्षण आहे, कारण आता मी पुन्हा निवडणूक लढवणार नाही, मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद'', असं म्हणत ते यावेळी काहीसे भावूकही झाल्याचे पाहायला मिळाले.

BJP News
Nawab Malik : नवाब मलिकांना मोठा दिलासा; जामीन अर्जावर तातडीने सुनावणी घेण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

कर्नाटकमध्ये काही महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे सर्वच पक्ष आतापासूनच मोर्चे बांधणी करत असून येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारी करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

सत्ताधारी भाजपनेही जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बीएस येडियुरप्पा यांनी राजकारणातून निवृत्ती घेतल्यामुळे आश्वर्य व्यक्त करण्यात येत आहे.

BJP News
BJP News: अरेरे... बायको म्हणते, नगरसेवक असून काय उपयोग?

यावेळी येडियुरप्पा म्हणाले की, ''विरोधक म्हणतात की मला मुख्यमंत्रीपदावरून हटवण्यात आले. मात्र, हे चुकीचे आहे. मला कोणीही मुख्यमंत्रीपदावरून हटवले नव्हते. मीच वयामुळे हा निर्णय घेतला होता'', असं म्हणत त्यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.

BJP News
Sharad Pawar : 'राष्ट्रपती राजवटीबाबत 'ते' विधान चेष्टेत केलं : शरद पवारांचे भाष्य !

''येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला पुन्हा एकदा सत्तेत आणण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. मी याआधीही सांगितले, आता मी निवडणूक लढवणार नाही. मात्र, पक्षाने मला दिलेला सन्मान आणि पद मी कधीही विसरणार नाही''.

''निवडणूक न लढवण्याचा अर्थ असा नाही की मी घरी बसणार. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पूर्ण राज्याचा दौरा करणार आहे. उमेदवाराच्या प्रचारामध्येही सहभागी होणार असून पक्ष मजबूत करण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत काम करत राहणार आहे '', असं येडियुरप्पा यावेळी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in