अमित शहांच्या मतदारसंघात आता 'कलम ३७०'

तरुण मतदारांना भाजपकडे आकर्षित करण्यासाठी या टुर्नामेंट आयोजन केल असल्याचे राजकीय विश्लेषणाचं मत आहे. या महिन्यात ही टुर्नामेंट होणार आहे.
amit shah
amit shahsarkarnama

नवी दिल्लीः जन्मू -काश्मिरला स्वतंत्र राज्याचा दर्जा देणारे राज्यघटनेचे कलम ३७० (section 370) मोदी सरकारनं २०१९ मध्ये हटवलं. या निर्णयाला दोन वर्ष पूर्ण होत आहे. यानिमित्ताने गृहमंत्री अमित शहा (amit shah) यांनी आपल्या मतदार संघात (गांधीनगर) किक्रेट स्पर्धेचे आयोजन केलं आहे. अमित शहा यांचीच ही संकल्पना आहे.

तरुण मतदारांना भाजपकडे आकर्षित करण्यासाठी या टुर्नामेंट आयोजन केलं असल्याचे राजकीय विश्लेषणाचं मत आहे. या महिन्यात ही टुर्नामेंट होणार आहे. २००७ पासून अमित शहा गुजरात क्रिकेट असोसिएशनशी संबधित आहेत. तर त्यांचा मुलगा जय शहा बीसीसीआयचे सचिव आहेत. गांधीनगर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे प्रभारी हर्षद पटेल म्हणाले, ''क्रिकेट व कबड्डीच्या माध्यमातून तरुणांना पक्षाकडे आकर्षून घेण्याचा आमचा उद्देश आहे. या क्रिकेट स्पर्धांमध्ये प्रत्येक वॉर्डातून दोन संघांना समाविष्ट केले जातील,"

३७० कलम हटवण्यात कळीची भूमिका बजावल्याबद्दल भाजपचे नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या गांधी नगर लोकसभा मतदारसंघात ‘जीएलपीएल ३७०’ (गांधीनगर लोकसभा प्रिमियर लीग ३७०) क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हे सर्व क्रिकेट सामने टेनिस बॉलवर होणार आहेत.

amit shah
PNB Scam : फरार मेहुल चोक्सीला अपहरणाची भीती!

अहमदाबाद व गांधीनगर लोकसभा मतदारसंघात (amit shah constituency) १८०० बूथ असून क्रिकेट संघ, स्थान व समालोचकांची जबाबदारी भाजपने आपल्या पदाधिकार्यांकडे सोपवली आहे. गांधीनगर लोकसभा मतदारसंघात वेजलपूर, घाटलोदिया, नारनपुरा, साबरमती, कलोल, गांधीनगर (उत्तर) व साणंद हे ७ विधान सभा मतदारसंघात आहेत.

अहमदाबाद शहरातील भाजप महासचिव जीतूभाई पटेल यांच्या सहकार्यातून ही स्पर्धा घेतली जात आहे. राज्य घटनेतील कलम ३७०चे नाव क्रिकेट स्पर्धेला देण्यामागचे कारण अमित शहा यांनी हे कलम रद्द करण्यात मोठी कामगिरी केल्याचे पटेल यांचे म्हणणे आहे.

गांधीनगर मतदारसंघासाठी एक कबड्डी स्पर्धा आणि सात विभागांसाठी प्रत्येकी एक अशा सात क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. सध्या ही स्पर्धा फक्त पुरुषांसाठी असेल.

पाच वर्षांपूर्वी गांधीनगरमध्ये ‘कर्णावती प्रिमियर लीग’चे आयोजन करणारे गुजरातचे राज्यमंत्री जगदीश विश्वकर्मा यांना या स्पर्धेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com