रशिया-युक्रेन युद्धात भारतीय विद्यार्थ्याचा दुसरा बळी

(Indian Student Killed in Ukraine) विद्यार्थी पंजाबचा रहिवासी होता.
russia-ukraine war
russia-ukraine war

नवी दिल्ली: रशिया-युक्रेन युद्धादरम्यान (russia-ukraine war) आज (२ मार्च) पुन्हा एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. चंदन जिंदाल (२२) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. हा विद्यार्थी पंजाबचा रहिवासी होता. (Indian Student Killed in Ukraine)

विन्नित्सिया शहरातील मेमोरियल मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये शिकणारा चंदन जिंदल हा विद्यार्थी आजारी पडला होता. उपचारावेळी त्याचा जीव गेल्याची माहिती आहे. चंदनच्या मेंदूला रक्त पुरवठा कमी झाल्याने त्याला खारकीवमधील शहरातील रुग्णालयात उपचार सुरु होते. आज उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह परत आणण्यासाठी त्याच्या वडिलांनी केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे.

russia-ukraine war
धक्कादायक : रशिया-युक्रेन युद्धात भारतीय विद्यार्थ्याचा हकनाक बळी

त्याचबरोबर, युक्रेनमधील भारतीय दूतावासाने खारकीवमधील भारतीय नागरिकांना तातडीची सूचना जारी केली आहे. भारतीयांनी तातडीने खारकीव सोडण्याचे आदेश भारतीय दुतावासाने दिले आहेत. शक्य तितक्या लवकर पिसोचिन, बेझल्युडोव्हका आणि बाबेकडे जाण्याचा सल्ला दुतावासीने जारी केला आहे.

रशियन सैन्य युक्रेनमध्ये हल्ले करत आहे. युद्धाच्या सातव्या दिवशी सकाळपासून रशियन सैनिक राजधानी कीववर हल्ले करत आहेत. सकाळपासून सुरू असलेल्या गोळीबारात आतापर्यंत बराच विध्वंस झाला आहे. बुधवारी सकाळपासून हे हल्ले सुरू आहेत. कीवमध्ये सरकारी इमारतींवर हल्ले होत आहेत. आता हा विध्वंस भीषण वळणावर आली आहे.

दरम्यान, रशिया-युक्रेनमध्ये युद्ध सुरू असून, हजारो भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. या विद्यार्थ्यांना तेथून भारतात आणण्यासाठी मोदी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. यातच आता युद्धात नवीन शेखरप्पा या भारतीय विद्यार्थ्याचा हकनाक बळी गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याला परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनीही दुजोरा दिला आहे. (Indian Student Killed in Ukraine)

अरिंदम बागची यांनी ट्विटरव म्हटले आहे की, खारकीव्ह येथे आज सकाळी बॉम्बहल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ही अतिशय दु:खदायी घटना आहे. या मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांच्या संपर्कात परराष्ट्र मंत्रालय आहे. परराष्ट्र मंत्रालयाने या संदर्भात रशिया आणि युक्रेनच्या राजदूतांशी संपर्क साधला. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना तेथून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सुरक्षित पर्याय उपलब्ध करुन द्यावेत, अशी मागणी त्यांच्याकडे करण्यात आली आहे. याचप्रकारची मागणी भारताच्या रशिया आणि युक्रेनमधील राजदूतांनीही केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com