शिल्पा शेट्टी अन् राज कुंद्राच्या अडचणीत वाढ; सेबीनंही केली कारवाई  

सेबीनं मागवलेल्या खुलाशात त्यांनी ही चुक मान्य केली आहे.
SEBI imposes a penalty of Rs 3 lakhs on Shilpa Shetty and Raj Kundra
SEBI imposes a penalty of Rs 3 lakhs on Shilpa Shetty and Raj Kundra

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. पॉर्न फिल्मची निर्मिती केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. त्याचा जामीनही न्यायालयाने फेटाळला आहे. त्यातच आता द सिक्युरिटीज अॅन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियानेही (सेबी) कारवाईचा बडगा उगारला आहे. (SEBI imposes a penalty of Rs 3 lakhs on Shilpa Shetty and Raj Kundra)

शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा व त्यांची कंपनी विआन इंडस्ट्रीकडून व्यापाराच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचा ठपका सेबीनं ठेवला. आहे. सेबीनं मागवलेल्या खुलाशात त्यांनी ही चुक मान्य केली आहे. पण त्यानंतर सेबीकडून त्यांच्यावर कारवाई करत तीन लाखांचा दंड ठोठावला आहे. व्यापारविषयक माहिती देण्यास तीन वर्षांचा विलंब करण्यात आल्याचे आढळून आले आहे. 

दरम्यान, पॉर्न फिल्म प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू असून, या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढण्याच्या दिशेने पोलिसांनी पावले टाकली आहेत. पॉर्न व्हिडीओ बनवून ते ऑनलाईन अपलोड करणा-या रॅकेट प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने राज कुंद्रा याला अटक केली. त्याला तीन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणात तो मुख्य सूत्रधार आहे.

या प्रकरणी राज कुंद्राची पत्नी शिल्पा शेट्टी हिचा सहभाग होता का याचाही तपास पोलीस करीत आहेत. पोलिसांनी तिचा जबाब यापूर्वीच नोंदवला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिल्पा शेट्टी यांना अद्याप क्लिन चिट दिलेली नाही. सर्व शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत. फॉरेन्सिक ऑडिटर्सची नियुक्ती करण्यात आली असून ते या प्रकरणाशी संबंधित सर्व बँक खात्यांमध्ये झालेल्या व्यवहारांची तपासणी करत आहेत. 

या प्रकरणात राज कुंद्राचा मेव्हणा प्रदीप बक्षी याचा केवळ चेहरा समोर केला जात होता, असा संशय पोलिसांना आहे. हॉटशॉट्सचे सर्व काम कुंद्रा स्वत:पाहत होता. त्याला अटक केल्यानंतर काही पिडीत पोलिसांकडे आले आणि त्यांनी जबाब दिल्याचे पोलिसांनी सांगितले. अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिला साक्षीदार म्हणून जबाब देण्यासाठी बोलवण्यात आल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com