U.U. Lalit|नियुक्तीनंतर काही तासातचं सरन्यायाधीश यु.यु. ललित यांचा मोठा निर्णय...

Gujrat Riots| U.U. Lalit| गुजरात राज्यात 2002 साली झालेल्या दंगलीप्रकरणी आज सर्वोच्च न्यायाालयात सुनावणी पार पडली.
Gujrat Riots| U.U. Lalit|
Gujrat Riots| U.U. Lalit|

नवी दिल्ली : गुजरात राज्यात 2002 साली झालेल्या दंगलीनंतर दाखल झालेल्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने बंद केल्या आहेत. या सर्व याचिकांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी आपल्या देखरेखीखाली करण्याची मागणी केली होती. 2008 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले होते. एसआयटीच्या अहवालाच्या आधारे दंगलीशी संबंधित जवळपास सर्वच खटल्यांवर कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय आला आहे. त्यानंतर आज याचिकाकर्त्यांनीही सर्वोच्च न्यायालयात सुनावणी प्रलंबित ठेवण्याची गरज नसल्याचे मान्य केले आहे.

ज (३१ ऑगस्ट) बऱ्याच दिवसांनी हे प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश यू यू ललित, न्यायमूर्ती एस. रवींद्र भट आणि जमशेद पार्डीवाला यांच्या खंडपीठाने, आता सुनावणीची गरज आहे का? असा सवाल याचिकाकर्त्यांना विचारला. यावर एसआयटीच्या वतीने ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी म्हणाले की, दंगलीच्या 9 पैकी 8 प्रकरणांमध्ये कनिष्ठ न्यायालयाने निकाल दिला आहे. यातील अनेकांना शिक्षा झाली आहे. आता त्याच्या याचिका उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

Gujrat Riots| U.U. Lalit|
भाजपच्या आता गावोगावी शाखा; राज्यात 10 लाख वॉरिअर

वकील मुकुल रोहतगी यांनी न्यायाधीशांना सांगितले की, विशेष न्यायालयात फक्त नरोडा गावाशी संबंधित खटल्याचा निर्णय येणे बाकी आहे. याचिकाकर्त्याच्या बाजूने अधिवक्ता अपर्णा भट्ट, एजाज मकबूल आणि अमित शर्मा यांनीही सर्वोच्च न्यायालयात जुन्या याचिका प्रलंबित ठेवण्याची गरज नाही, याला सहमती दर्शवली.

वकिलांशी चर्चा केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने जवळपास 20 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सर्व याचिका निकाली काढल्या. 2002 ते 2004 दरम्यान दाखल झालेल्या एकूण 11 याचिका निकाली काढण्यात आल्या. 2003 मध्ये राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) दाखल केलेली याचिका यातील सर्वात प्रमुख होती. याशिवाय सिटीझन फॉर जस्टिस अँड पीस, फरजाना बानू, इम्रान मोहम्मद, युसूफ खान पठाण, फादर सेड्रिक प्रकाश आणि उमेद सिंग गुलिया या याचिकाकर्त्यांच्या याचिकांवरील सुनावणीही आज औपचारिकपणे बंद झाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in