आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या मोदींकडे सहा मागण्या ; पुन्हा चर्चा सुरू करा

''कृषी कायदे मागे घेण्याच्या घोषणेचे स्वागत करतो आणि आशा करतो की तुमचे सरकार हे वचन लवकर पूर्ण करेल,'' असे नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना लिहिलेल्या पत्रात किसान मोर्चानं (kisan morcha) म्हटलं आहे.
आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या मोदींकडे सहा मागण्या ; पुन्हा चर्चा सुरू करा
Narendra Modisarkarnama

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी तीन कृषी कायदे (Farm Laws) मागे घेण्याची घोषणा शुक्रवारी आपल्या भाषणात केली. या घोषणेनंतर संयुक्त किसान मोर्चाने (kisan morcha)आपले आंदोलन सुरु ठेवले आहे. किसान मोर्चाकडून पंतप्रधान मोदी यांच्याकडे सहा मागण्या करण्यात आल्या आहेत. यााबाबत किसान मोर्चानं मोदींना (PM Narendra Modi) पत्र लिहिलं आहे.

सिंघू सीमेवर संयुक्त किसान मोर्चाची रविवारी बैठक झाली. त्यानंतर केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या शेतकरी संघटनांच्या संयुक्त किसान मोर्चाने नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले. या पत्रात आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या सहा मागण्या केल्या आहेत. केंद्र सरकारने तातडीने शेतकऱ्यांशी पुन्हा चर्चा सुरू करावी, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहिल, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

'१९ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांनी देशाच्या नावे तुमचा संदेश ऐकला. त्यावरून आमच्या लक्षात आले की चर्चेच्या ११ फेऱ्यांनंतर तुम्ही द्विपक्षीय समाधानाऐवजी एकतर्फी घोषणेचा मार्ग निवडला, परंतु तुम्ही तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केल्याचा आम्हाला आनंद आहे. आम्ही या घोषणेचे स्वागत करतो आणि आशा करतो की तुमचे सरकार हे वचन लवकरात लवकर पूर्ण करेल,'' असे पत्रात किसान मोर्चानं म्हटलं आहे.

Narendra Modi
राणे म्हणतात, ''अजितदादांकडे मुख्यमंत्रीपदाचा चार्ज द्या''

नरेंद्र मोदी (pm Narendra Modi) यांनी तीनही कृषी कायदे (Agriculture Laws) मागे घेण्याची मोठी घोषणा शुक्रवारी केली. देशाची माफी मागत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी त्यांनी केलेले तीन कृषी कायदे (Agriculture act) मागे घेण्याचा निर्णय घेतला. ''सामान्य शेतकऱ्यांना आम्ही हे कायदे समजून सांगण्यात कमी पडलो,'' असे म्हणत मोदी शेतकऱ्यांच्या आंदोलनासमोर झुकले. आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रानं विरोधकांचा विरोध डावलून संसदेत बळाच्या जोरावर संमत केलेल्या कृषी कायद्यांच्या फायद्यांचा फायदा पुन्हा एकदा वाचून दाखवले.

''तीन कृषी कायदे (Agriculture Laws) मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे, या महिन्याच्या अखेरीस सुरु होणाऱ्या संसद सत्रात हे तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याची संविधानिक प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल., या महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात आम्ही हे तीन कृषी कायदे रद्द करण्याची घटनात्मक प्रक्रिया पूर्ण करू,'' असे मोदी यांनी सांगितलं.''शेतकऱ्यांच्या समस्या मी जवळून पाहिल्या आहेत. माझ्या सरकारनं शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिलं. अल्पभूधारक शेतकऱ्यांना मदत, अनेक सुविधा दिल्या. कृषी बजेट पहिल्यापेक्षा पाच पट वाढवलं आहे. चार वर्षात १ लाख कोटींहून अधिक शेतकऱ्यांना मदत केली,''असे मोदींनी सांगितलं.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in