I am Sorry... म्हणत अखेरच्या दिवशी एन.व्ही. रमण्णा यांनी मागितली माफी

CJI N V Ramana | दिल्लीला जाण्यापूर्वी त्यांनी मला "सावधगिरी बाळगा" असे सांगितले होते
CJI N V Ramana
CJI N V Ramana

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश (CJI) एन.व्ही. रमण्णा आज ( २६ ऑगस्ट) सेवानिवृत्त झाले. दिल्ली हायकोर्ट बार असोसिएशनने गुरुवारी (२५ ऑगस्ट) त्यांच्यासाठी निरोप कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी त्यांचे अनुभव शेअर केले. (N.V. Ramana retired today)

पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, 'दिल्लीत कधीही संप किंवा धरणे किंवा कोणत्याही आंदोलनाला सामोरे जाण्याची माझ्यावर वेळ आली नाही. पण मी दिल्लीत येण्यापूर्वी, तुम्ही दिल्लीला जात आहात, त्यामुळे आता धरणे आणि संपाची तयारी करा, असा इशारा माझ्या सहकाऱ्यांनी दिला होता. पण माझ्या बाबतीत असे कधीच घडले नाही. दिल्लीला जाण्यापूर्वी त्यांनी मला "सावधगिरी बाळगा" असे सांगितले होते. पण दिल्लीतील लोक खूप सुसंस्कृत, ज्ञानी आणि तितकेच आक्रमक आहेत. पण त्या सर्वांकडून मला आपुलकी आणि प्रोत्साहन मिळाले, अशा भावना एन.व्ही. रमण्णा यांनी यावेळी व्यक्त केल्या.

CJI N V Ramana
भाजपने 6300 कोटी खर्च करून 277 आमदार खरेदी केले; केजरीवालांचा गंभीर आरोप

त्यांच्या अशांततेच्या काळात लोक त्यांच्या पाठीशी कसे उभे राहिले, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. माझ्या आयुष्यातील संकटांच्या काळात बार असोसिएशनचे प्रत्येक सदस्य, विशेषत: दिल्लीतील सदस्य ठामपणे माझ्या पाठीशी उभे राहिले. त्यांच्या समर्थनार्थ जनतेनेही ठराव पास केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. इतकेच नव्हे तर, त्यांच्या पुर्वीच्या कार्यकाळात जनहित याचिका आणि वकीलही खूप शिस्तबद्ध असल्याचं त्यांनी नमुद केलं.

मात्र यावेळी बोलताना त्यांनी उपस्थितांची माफीही मागितली. १६ महिन्यांत मला फक्त ५० दिवस प्रभावी आणि पूर्णवेळ सुनावणी घेता आली. माझ्या कार्यकाळात लवकर सुनावणीसाठी सूचीबद्ध प्रकरणे घेण्यावर लक्ष केंद्रित करू शकलो नाही. त्यासाठी मला माफ करा, अशा शब्दातं रमण्णा यांनी शेवटच्या कामकाजाच्या दिवशी खंडपीठात माफी मागितली. आपल्या कार्यकाळात बहुतांश वेळा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी घ्यावी लागली. खटल्यांची यादी आणि पोस्टिंगवर अधिक लक्ष केंद्रित करता आले नाही, याबद्दल मला खेद आहे'. असंही त्यांनी यावेळी म्हटलं.

या कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कौल, इंदिरा बॅनर्जी, संजीव खन्ना, एस रवींद्र भट आणि हिमा कोहली उपस्थित होते. या कार्यक्रमाला दिल्ली उच्च न्यायालयाचे सर्व माजी न्यायाधीश तसेच बार असोसिएशनचे सदस्य तसेच उच्च न्यायालयाचे न्यायाधीश उपस्थित होते. सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी आणि कॉलेजियमने दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी उपस्थितांचे आभारही मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com