रियावर आरोप करणाऱ्या सगळ्यांची सीबीआय करेल चौकशी

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी तीन केंद्रीय यंत्रणा तपास करीत आहेत. अद्याप सुशांतचा मृत्यू कशामुळे झाला हे समोर आलेले नाही.
satish maneshinde requests cbi to interrogate persons accusing rhea chakraborty
satish maneshinde requests cbi to interrogate persons accusing rhea chakraborty

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याचा मृत्यू होण्याच्या एक दिवस आधी रिया चक्रवर्ती त्याला भेटली होती, असा दावा रियाच्या शेजारी राहणाऱ्या महिलेने केला होता. मात्र, केंद्रीय अन्वेषण विभागाने केलेल्या चौकशीत या शेजारी महिलेने घूमजाव केले आहे. अखेर सीबीआयने त्या महिलेला तंबी देऊन सोडून दिले आहे. रिया चक्रवर्ती हिच्याबद्दल खोटे दावे करणाऱ्या सर्वांवर कारवाई करण्याचा इशारा तिचे वकील सतिश मानेशिंदे यांनी दिला आहे. 

रिया चक्रवर्ती हिच्याबद्दल टीव्ही आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये खोटे आणि बनावट दावे करणाऱ्या व्यक्तींचा यादी सीबीआयकडे पाठवण्यात येणार आहे. या प्रकरणाच्या तपासाबद्दल खोटी पसरवणाऱ्यांवर सीबीआयने कायदेशीर कारवाई करावी, असे रियाचे वकील सतिश मानेशिंदे यांनी म्हटले आहे. रिया चक्रवर्तीबद्दल खोटी माहिती पसरवणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांचे जबाबही सीबीआयने नोंदवावेत, असेही मानेशिंदे यांनी म्हटले आहे. 

सुशांतच्या मृत्यूच्या एक दिवस आधी रिया आणि सुशांतची भेट झाली होती, असा दावा रियाच्या शेजारी राहणाऱ्या महिलेने केला होता. तिने वृत्तवाहिनीशी बोलताना हा दावा केला होता. रियाच्या घरी तपासासाठी गेलेल्या सीबीआयच्या पथकाने त्या महिलेची भेट घेतली. त्यावेळी तिने घूमजाव करीत असे काही पाहिले नसल्याचे म्हटले आहे. 

सुशांत मृत्यू प्रकरणात ड्रग्जच्या अँगलचा तपास करणाऱ्या अमली पदार्थ विरोधी विभागाने (एनसीबी) सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिला 6 सप्टेंबरला अटक केली होती. उच्च न्यायालयाने रियाला जामीन मंजूर केला आहे. 'एनसीबी'कडून रिया आणि तिचा भाऊ शौविक यांची चौकशी झाली होती. ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या बॉलीवूडमधील काही कलाकारांची नावे या दोघांनी उघड केली होती. बॉलीवूडमधील पार्ट्या आणि ड्रग्जची तस्करी यावरही या दोघांनी प्रकाश पाडला होता. या प्रकरणी अभिनेत्री रकुल प्रीत सिंह, सारा अली खान, दीपिका पदुकोण आणि श्रद्धा कपूर यांच्यासह काही जणांची एनसीबीने चौकशी केली आहे. 

रियावर अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (एनडीपीएस) कलम 8 (सी), 20 (बी), 28 आणि 29 नुसार ड्रग्जचे खरेदी, सेवन, बाळगणे आदी आरोप तिच्यावर ठेवण्यात आले आहेत. रिया ही ड्रग्ज रॅकेटची सक्रिय सदस्य असून, तिने अमली पदार्थांचे सेवन केले आहे आणि ती यातील आर्थिक व्यवहारांमध्येही सहभागी होता, असे एनसीबीने म्हटले आहे. 

सुशांत हा 14 जूनला मुंबईतील घरी मृतावस्थेत सापडला होता. याचा तपास मुंबई पोलिस करीत होते. या प्रकरणी पोलिसांनी 56 जणांचे जबाब नोंदविले होते. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती यांच्यासह इतर काही जणांचा समावेश होता. नंतर सर्वोच्च  न्यायालयाने हा तपास सीबीआयकडे दिला होता. 

Edited by Sanjay Jadhav 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com