अम्मांच्या पावलावर चिनम्मांचं पाऊल...आधी पक्ष अन् नंतर मुख्यमंत्रिपद!

शशिकला यांच्या चार वर्षानंतर झालेल्या पुनरागमनानंतर तमिळनाडूत राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलू लागली आहेत.
sasikalas aim is taking control of aiadmk party and stay relevent in politics
sasikalas aim is taking control of aiadmk party and stay relevent in politics

चेन्नई : तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिला यांच्या निकटवर्ती सहकारी व्ही.के.शशिकला यांचे चार वर्षानंतर राज्यात पुनरागमन झाले आहे. यानंतर तमिळनाडूत राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलू लागली आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शशिकलांनी आता अम्मांच्या पावलावर पावले टाकण्यास सुरवात केली आहे. 

शशिकलांना शिक्षा झाल्यामुळे त्यांना पुढील सहा वर्षे निवडणूक लढवता येणार नाही. याचाच अर्थ त्या आगामी आणि त्यापुढील 2025 ची विधानसभा निवडणूक लढवू शकणार नाहीत. त्यांचे आता वय 66 आहे. म्हणजे 72 वर्षांपर्यंत त्यांना निवडणूक लढवण्यास तसेच, मुख्यमंत्रिपदावर राहण्यास बंदी असेल. एवढा काळ तमिळनाडूच्या राजकारणात टिकून राहण्यासाठी त्यांना केवळ अण्णाद्रमुक पक्षाचा आधार आहे. त्यामुळे पक्ष पुन्हा ताब्यात घेण्यासाठी त्यांनी सावध पावले टाकण्यास सुरवात केली आहे. 

याचाच भाग म्हणून शशिकला यांनी चेन्नईतील न्यायालयात मुख्यमंत्री एडापड्डी पलानीस्वामी, उपमुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांच्यासह अण्णाद्रमुक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात न्यायालयात नव्याने अर्ज केला आहे. शशिकला या पक्षाच्या सरचिटणीस होत्या, पण २०१७ मध्ये त्यांना शिक्षा झाल्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. त्यावेळीच शशिकला यांनी याविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. आता त्यांनी या प्रकरणाची लवकर सुनावणी घेण्याची मागणी केली आहे. त्यानुसार १५ मार्चला या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. 

पक्ष ताब्यात घेण्यासाठी त्यांच्यासमोर पलानीस्वामी आणि पनीरसेल्वम यांचा मोठा अडसर आहे. तो दूर करण्यासाठी त्यांनी बंगळूरमधील कारागृहातून बाहेर पडल्यापासून विचारपूर्वक पावले उचलली आहेत. पक्षाचा ध्वज लावलेल्या मोटारीतून राज्यात दाखल होणे हा त्याचाच भाग होता. याचबरोबर कर्नाटक सीमेपासून चेन्नईपर्यंत त्यांनी रस्त्याने जाणे पसंत केले. या प्रवासाला त्यांनी भव्य रोड शोचे स्वरुप देत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. राज्यातील राजकारणात अजूनही आपण ताकदवान आहोत, असे त्यांनी दाखवून दिले. त्यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी झालेली प्रचंड गर्दी हे याचेच द्योतक होते. यामुळे अण्णाद्रमुकच्या अनेक नेत्यांनीही कारवाईला न घाबरता त्यांचे स्वागत केले आहे. 

जयललिता यांच्यासोबत सुमारे 30 वर्षे शशिकला या सावलीसारख्या राहिल्या. जयललितांना अम्मा तर शशिकलांना चिनम्मा असे संबोधत. आता जयललितांच्या पावलावर पाऊल टाकत राज्यातील सत्ताकेंद्र ताब्यात घेण्याच्या दिशेने पावले टाकण्यास सुरवात केली आहे. यात त्या काही प्रमाणात यशस्वी झाल्या असल्या तरी त्यांचे भवितव्य न्यायालयीन निकालावर अवलंबून असेल, असे सध्या तरी दिसत आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com