Jalgaon Politics : वल्लभभाईंच्या पुतळा अनावरणावरून ठाकरे गट-भाजप आमनेसामने !

BJP Vs Shivsena Thackeray Group : सरदार पटेल यांच्या जयंतीदिनी अनावरण करणे योग्य राहिल, भाजपचा निवेदन
Jalgaon Politics
Jalgaon PoliticsSarkarnama

Jalgaon Politics : महापालिकेच्या आवारात उभारण्यात येत असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल (Sardar Vallabhabhai) यांच्या पुतळ्याच्या अनावरणावरून सत्ताधारी शिवसेना ठाकरे गट व विरोधी पक्षात असलेले भारतीय जनता पक्षात वाद निर्माण झाला आहे. शिवसेना ठाकरे गटातर्फे येत्या १० सप्टेंबर रोजी शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते अनावरण करणे निश्‍चित झाले आहे, तर भाजपने त्यास विरोध केला असून, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिनी अनावरण करण्याची मागणी त्यांनी केली आहे. (Latest Marathi News)

Jalgaon Politics
Uddhav Thackeray Vs BJP : भाजपच्या धडाडत्या तोफा अचानक ठाकरेंवर का वळाल्या ? इंडिया आघाडीतील वाढतं महत्व,पंतप्रधानपदाचा चेहरा की...

जळगाव महापालिकेत शिवसेना ठाकरे गटाची सत्ता असून महापौरपदी जयश्री महाजन आहेत, तर उपमहापौरपदी कुलभूषण पाटील आहेत. महापालिकेच्या आवारात सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा बसविण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार त्याचे काम सुरू झाले आहे. हा पुतळा भाजपचे आमदार सुरेश भोळे यांनी आपल्या स्वखर्चातून बनवून महापालिकेला दिला आहे. पुतळा बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. सत्ताधारी शिवसेना ठाकरे गटातर्फे या पुतळ्याचे अनावरण शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

उध्दव ठाकरे १० सप्टेबरला जळगावात येत आहे, त्यांच्या हस्ते पिंप्राळा येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळयाचे अनावरण करण्यात येत आहे, तर त्याच दिवशी त्यांच्या हस्ते महापालिकेच्या आवारात बसविण्यात येत असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या दृष्टीने प्रशासनातर्फे तयारी करण्यात आली असून शासकीय नियमाप्रमाणे हा कार्यक्रम करण्यात येणार आहे.

भारतीय जनता पक्षाने व शिवसेना शिंदे गटाने मात्र या अनावरण कार्यक्रमाला विरोध केला आहे, त्यांनी पुतळ्याचे अनावरण सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिनी ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी करावे, अशी मागणी केली असून, याबाबत त्यांनी महापालिका आयुक्तांना निवेदनही दिले आहे. सरदार पटेल यांच्या जयंतीदिनी अनावरण करणे योग्य राहिल, असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. भाजपचे महापालिकेतील गटनेते अश्‍वीन सोनवणे, शिंदे गटाचे गटनेते दिलीप पोकळे, माजी नगरसेवक कैलास सोनवणे, नगरसेविका सिमा भोळे, नगरसेवक जितेंद्र मराठे, तसेच शिंदे गटाचे नवनाथ दारकुंडे आदीनी हे निवेदन दिले आहे.

Jalgaon Politics
Nashik NCP Executive : शरद पवार गटाची नाशिकमध्ये निवडणूक मोर्चेबांधणी; नव्या शिलेदारांकडे राष्ट्रवादीचे सुकाणू

महापौर जयश्री महाजन यांनी म्हटले आहे, की महापालिकेच्या आवारातील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण १० सप्टेबरला शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. संपूर्ण शासकीय प्रोटोकॉल नुसार जिल्ह्यातील खासदार, आमदार तसेच महापालिकेतील सर्व गटाचे नगरसेवक यांना निमंत्रित करून हा कार्यक्रम करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व एकत्रित येवून कार्यक्रम करणार आहेत.

Jalgaon Politics
NCP Crisis News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे 'RRR' पक्षाला सुपरहीट करणार का? सभांचा लावणार धडाका..

शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख व नगरसेवक विष्णू भंगाळे म्हणाले, " जळगावात सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारण्यात यावा यासाठी आपण सन २००४ पासून पाठपुरावा करीत आहोत. त्याला आता यश आले असून महापालिकेच्या आवारात उभारण्यात येणाऱ्या पुतळयाचे अनावरण उध्दव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येत आहे. त्याला विरोध न करता सर्वांनी एकत्रित येवून कार्यक्रम करावा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in