राऊतांचे प्रयत्न वाया जाणार? 'मविआ'च्या जागा वाटपात काँग्रेसचा खोडा

Goa assembly election : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसपुढे झोळी घेवून उभे नाही
NCP-Shivsena-Congress
NCP-Shivsena-CongressSarkarnama

पणजी : गोव्यात विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभुमीवर युती-आघाडीच्या राजकारणाने वेग घेतला आहे. यात सध्या जोरदार चर्चा सुरु आहे ती काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची. याबाबत अजून कोणताही ठोस निर्णय समोर आलेला नाही. मात्र आता काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला जागा सोडण्यासाठी फारशी अनुकूल नसल्यानेच या आघाडीचे घोडे अडले असल्याची माहिती समोर येत आहे. पण त्याचवेळी शिवसेनेसाठी मात्र ३ जागा सोडण्यास तयार असल्याची माहितीही मिळत आहे.

मात्र शिवसेनेने आता या ३ जागांसाठी काँग्रेससोबत न जाता राष्ट्रवादीसोबतची मैत्री निभावण्याची भूमिका घेतली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. याबाबत आज संजय राऊत यांना विचारले असता त्यांनीही शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीबाबत खुलासा केला आहे. ते म्हणाले, आम्ही किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसपुढे झोळी घेवून उभे नाही. आम्ही त्यांच्यापुढे एकत्र लढण्याचा प्रस्ताव ठेवला होता. राहुल गांधींसोबतही आमची चर्चा झाली, ते सकारात्मक आहेत, पण स्थानिक नेत्यांच्या मनात काय आहे, हे मला माहित नाही.

NCP-Shivsena-Congress
काँग्रेस-राष्ट्रवादीने भाजपचा करेक्ट कार्यक्रम केला! चंद्रकांतदादांनीच दिली कबुली

संजय राऊत म्हणाले, आम्ही काँग्रेसला ४० पैकी ३० जागा लढण्याचा प्रस्ताव दिला होता. तर उर्वरित १० शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड पक्षाला एकत्रितपणे द्या, असे आम्ही म्हटले होते. त्यातही आम्ही गोव्यात काँग्रेसने कधीही न जिंकलेल्या जागा मागितल्या होत्या. आम्ही त्यांच्या खिशातले काहीही मागितले नव्हते. आता जमिनीवरील परिस्थिती वेगळी आहे. एकत्र लढलो नाही तर काँग्रेस सिंगल डिजिटमध्ये सुद्धा येणार नाही, असे वातावरण आहे. त्यामुळे आमच्यासारखे काही प्रमुख पक्ष काँग्रेसला आधार द्यायचा प्रयत्न करत आहेत. पण गोव्यातल्या स्थानिक नेत्यांच्या डोक्यात आहे हे माहित नसल्याचा पुनरोच्चार त्यांनी केला.

NCP-Shivsena-Congress
UP Election 2022 : संजय राऊतांनी पुन्हा डिवचलं; म्हणाले, भाजपला दुखवायचं...!

१८ तारखेला गोव्याच्या दौऱ्यावर :

दरम्यान संजय राऊत गोव्याच्या दौऱ्यावर देखील जाणार आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्यात ते १८ तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांचीही भेट घेणार आहेत. या भेटीत ते आघाडीसंदर्भात चर्चा करणार आहेत. तोपर्यंत काँग्रेससोबत आघाडीचा निर्णय अद्याप न झाल्यास गोव्यात राष्ट्रवादी आणि शिवसेना गोव्यात एकत्रित लढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र जर गोव्यात काही मनाप्रमाणे घडले नाही तर आम्ही स्वबळावर लढू, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in