'लूट का पैसा किरीट सोमय्या के घर में'; संजय राऊतांचा पुन्हा हल्लाबोल

Kirit Somiaya| Sanjay raut| INS vikrant Scam| केंद्राला जरा तरी लाज असेल तर किरीट सोमय्यांची सुरक्षा काढून घ्यावी
Kirit Somiaya| Sanjay raut
Kirit Somiaya| Sanjay raut

नवी दिल्ली : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप नेते किरीट सोमय्यांवर (Kirit Somaiya) आयएनएस विक्रांत घोटाळाप्रकरणी गंभीर आरोप केले. २०१३मध्ये भारतीय नौदलातून निवृत्त करण्यात आलेली विमानवाहू युद्धनौका “आयएनएस विक्रांत’चा ६० कोटी रूपयांना लिलाव करण्यात आला. आयएनएस विक्रांत राज्यातच राहावी, जहाज भंगारात न जाता त्याचे संग्रहालयात रुपांतर व्हावे यासाठी किरीट सोमय्यांनी पैसे जमा केले होते. मात्र हे पैसे राज्यपाल कार्यालयात जमाच झाले नसल्याचा आरोप संजय राऊतांनी केला.

या आरोपांनंतर त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट करत पुन्हा किरीट सोमय्यांवर निशाणा साधला. ''ये लूट... कीधर गयी? उलटा चोर कोतवाल को दांटे? 57 crors... Bjp जबाब तो देना पडेगा.. आयएनएस विक्रांत भंगार. लूट का पैसा किरीट सोमय्या के घर में.'' असे म्हणत सोमय्यांची चौकशी करण्याची मागणी केली.

Kirit Somiaya| Sanjay raut
म्हाडा घोटाळा... नोटीसांमुळे नाशिकच्या ११७ बिल्डरांची झोप उडाली!

तसेच, या प्रकरणी राजधानी दिल्लीतील संसद आवारात शिवसेना खासदारांनी फलक हातात घेत भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईचा निषेधही केला. केंद्रीय तपास यंत्रणांच्या दडपशाहीविरोधात शिवसेना खासदारांचं संसद आवारात महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी ईडी, सीबीआय, इन्कम टँक्स, सबने खोया जनता का विश्वास! डरेंगे नहीं, झुकेंगे नहीं, सच के लिए रूकेंगे नहीं! अशा आशयाचे फलक हातात घेत केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईचा निषेध केला.

दिल्लीहून तपास यंत्रणांची लोक येतात. आमच्या लोकांच्या घरात घुसतात. नोटीस नाही, वॉरंट नाही, समन्स नाही. ठीक आहे, मीही बघेन. काळ बदलेल आणि आमचीही वेळ येईल, असा इशाराही संजय राऊत यांच्यावर ईडीच्या कारवाईवर दिला.

संजय राऊतांनी काय आरोप केले

राज्यपाल कार्यालयात हे पैसे जमाच झाले नाहीत तर हे पैसे गेले कुठे असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला आहे. मग सोमय्यांनी पैसे निवडणूकीसाठी वापरले का, की मुलाच्या कंपनीत गुंतवले, असेही सांगत सोमय्या चार्टर्ड अकाऊंटटं असल्याने असा पैसा कुठे जिरवायचा, हे त्यांना चांगलच माहित आहे. किरीट सोमय्यांनी देशद्रोहाचा गुन्हा केला आहे, राज्यातील तपास यंत्रणांनी या प्रकरणाचा तपास करावा, अशी मागणी राऊतांनी केली.

काश्मीर फाईल पाहून झाली असेल तर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी INS विक्रांत फाईल पाहावी.किरीट सोमय्यांनी आयएनएस विक्रांतच्या नावाखाली जमा केलेल्या पैशांचं काय केले याचे उत्तर भाजपला द्यावे लागणार, केंद्राला जरा तरी लाज असेल तर किरीट सोमय्यांची सुरक्षा काढून घ्यावी, अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com