Sanjay Raut Latest Marathi News, Shivsena News, Maharashtra Political Crisis News
Sanjay Raut Latest Marathi News, Shivsena News, Maharashtra Political Crisis NewsSarkarnama

राष्ट्रपतीपदासाठी शिवसेनेचा NDA ला अन् उपराष्ट्रपतीपदासाठी UPA ला पाठिंबा : संजय राऊत

Sanjay Raut | Shivsena | NDA | UPA : युपीएकडून एकत्रितपणे माजी राज्यपाल मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी जाहीर

मुंबई : भारतात उद्या राष्ट्रपतीपदासाठी (Presidential Election) मतदान होणार आहे. उद्या सकाळपासून संसदेत आणि प्रत्येक राज्याच्या विधानभवनात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. भाजपप्रणित एनडीएकडून राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर काँग्रेसप्रणित युपीएकडून यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांना उमदेवरी देण्यात आली आहे. भाजप आणि मित्रपक्षांकडे दोन्ही सभागृह आणि राज्य विधानसभांमधील संख्याबळामुळे मुर्मू यांचे पारडे जड मानले जात आहे. (Presidential Election of india l Latest News)

याशिवाय शिवसेना, झारखंड मुक्ती मोर्चा या काँग्रेससोबतच्या पक्षांनीही आदिवासी या मुद्द्यावर मुर्मूंना पाठिंबा जाहीर केला आहे. दरम्यान, शिवसेनेने राष्ट्रपतीपदासाठी भाजपप्रणित एनडीएला पाठिंबा जाहीर केला असला तरी आता उपराष्ट्रपतीपदासाठी मात्र काँग्रेसप्रणित युपीएला पाठिंबा जाहीर केला आहे. युपीएकडून एकत्रितपणे माजी राज्यपाल मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली.

शरद पवार यांनी मार्गारेट अल्वा यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर त्यांना १७ पक्षाचा पाठिंबा असल्याचे सांगितले. यात शिवसेनेचेही (ShivSena) नाव होते. मात्र, शिवसेनेकडून अधिकृत भाष्य करण्यात आले नव्हते. यानंतर आता शिवसेना नेते, मुख्य प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी याबाबत भाष्य केले आहे. एएनआयशी बोलताना राऊत म्हणाले, ‘द्रौपदी मुर्मू या आदिवासी महिला आहे. देशातील आदिवासींबद्दल भावना आहे. आमचे अनेक आमदार-खासदारही आदिवासी समाजातील आहेत. त्यामुळेच आम्ही मुर्मू यांना पाठिंबा दिला. मात्र, उपराष्ट्रपतीपदासाठी आमचा पाठिंबा मार्गारेट अल्वा यांना असेल.

दरम्यान शिवसेनेने मुर्मू यांना खासदारांच्या दबावात पाठिंबा दिला असल्याच्या चर्चा होत्या. यावर बोलताना खासदारांनी दबाव टाकल्यामुळे आम्ही मुर्मू यांना पाठिंबा दिला असे नाही. काँग्रेसच्या प्रतिभाताई पाटील यांनाही आम्ही पाठिंबा दिला होता. तसेच काँग्रेसच्या प्रणव मुखर्जी यांनाही पाठिंबा दिला होता. आम्ही उमेदवार पाहून पाठिंबा दिला आहे. कोणाच्याही दबावात नाही, असे राऊत यांनी नागपुरमध्ये बोलताना स्पष्ट केले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in