
Sanjay Raut Reply to Basavaraj Bommai criticism) : महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर ठिणगी टाकण्याचं काम कर्नाटक सरकारकडून सुरु आहे. यानंतर बोम्मई यांनी सीमाप्रश्नाच्या विरोधात मांडलेला ठराव कर्नाटकच्या विधानसभेनं गुरुवारी एकमताने मंजूर केला. यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊतांचा देशद्रोही म्हणून उल्लेख करतानाच त्यांच्यावर चीनचे एजंट म्हणून टीकास्त्र देखील सोडले होते. आता बोम्मईंच्या याच टीकेला संजय राऊतांनी (Sanjay Raut) प्रत्युत्तर दिलं आहे.
संजय राऊत यांनी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.राऊत म्हणाले, जर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंना चीनचा इतकाच तिटकारा असेल, तर आधी त्यांनी त्यांच्या पंतप्रधानांचा निषेध करावा. बोम्मई जर आम्हाला चीनचे एजंट म्हणत असतील तर चीनचे पंतप्रधान शी जिनापिंग यांना अहमदाबादमध्ये बोलावून, झोपाळ्यावर बसवून त्यांना पापडी गाठ्या खाऊ घालणा-यांना काय म्हणणार असा सवाल उपस्थित करतानाच मोदींनीच चीनसाठी दरवाजे उघडले असल्याचंही राऊत यावेळी म्हणाले.
चीनने भारतात खुसखोरी केली आहे. त्याचप्रमाणे कर्नाटक महाराष्ट्रात घुसघोरी करते आहे, त्यामुळे आम्हालाही तोच मार्ग अवलंबावा लागेल असं मी म्हटले होतो. महाराष्ट्र-कर्नाटक वादात तेल ओतण्याचे काम बोम्मई करत आहेत. महाराष्ट्र-कर्नाटक वादात तेल ओतण्याचे काम बोम्मई करत आहेत. अमित शहांबरोबरच्या बैठकीत जे ठरलं होतं, ते मानायला बोम्मई तयारी नाहीत आणि आज ते आमचे संस्कार आणि संस्कृती काढत आहे. पण आम्हाला त्यांनी संस्कृती आणि संस्कार सांगण्याची गरज नाही असं प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिले आहे.
आज बोम्मईंची जीभ चालते आहे, कारण शिंदे फडणवीस गप्प आहेत. मात्र, आम्ही तिथे जाऊन आंदोलन करायला तयार आहोत. बोम्मईंनी आम्हाला तुरूंगात टाकले तरी हरकत नाही. यावेळी राऊतांनी बोम्मईंवर महाराष्ट्रात खटला दाखल करुनच दाखवावा. मात्र, सीमावादावर शिंदे फडणवीस सरकार शेपूट घालून बसलं आहे. बोम्मई आणि दाऊदलाही क्लिनचीट मिळेल असा हल्लाबोलही यावेळी राऊतांनी केला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.