मुफ्तींना फोन लावायचा असेल पण चुकून मातोश्रीवर लागला असावा : राऊतांचा राजनाथ यांना टोला

Sanjay Raut | Shivsena | Rajnath Singh : राजनाथ सिंहांनी ठाकरेंच्या फोनची सुरुवात 'अस्सलामु अलैकुम' म्हणतं केली
Sanjay Raut - Rajnath Shingh
Sanjay Raut - Rajnath ShinghSarkarnama

मुंबई : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांचा फोन आला होता. त्यावेळी राजनाथ सिंहांनी फोनची सुरुवात 'अस्सलामु अलैकुम' म्हणतं केली. त्यामुळे आपण सिंह यांच्यावर चांगलेच भडकले होतो. पण त्यांना 'जय श्रीराम'च्या घोषणेने उत्तर दिले, असा प्रसंग सांगत, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज शिवसेनेच्या माजी आमदारांच्या बैठकीत खळबळ उडवून दिली. (Shivsena | Uddhva Thackeray Latest News)

याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना विचारले असता ते म्हणाले, मला माहित नाही, पण फोन आला असेल आणि उद्धव ठाकरे बोलत असतील तर हे खरं असेल. मात्र राजनाथ सिंह यांना कदाचित जम्मू-काश्मिरच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांना फोन लावायचा असेल, पण त्यांच्या ऑपरेटरने चुकून मातोश्रीवर फोन लावला असावा, असा खोचक टोला लगावला.

या सगळ्यावरुन भाजपचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरेंना लक्ष केले असून आम्ही आमच्या नेत्याचा असा अपमान सहन करणार नसल्याचे त्यांनी सांगितले. बावनकुळे म्हणाले, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग हे अतिशय सुसंस्कृत नेते आहेत. फेसबुक लाईव्हवरील सर्व विनोद संपल्यामुळे उद्धव ठाकरे मनोरंजनासाठी असे विनोद करीत असावेत. पण आमच्या नेत्यांचा असा अपमान आम्ही सहन करणार नाही. आम्ही आता शांत आहोत आणि उद्धव ठाकरे यांनीही आम्हाला शांतच राहू द्यावे. तसेच चुकीच्या पद्धतीने महाराष्ट्राला भडकावू नये, असेही बावनकुळे यांनी ठणकावून सांगितले.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना (Shivsena) आणि भाजपमध्ये (BJP) संबंध मागील काही वर्षांपासून ताणले असल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत (NCP) जावून शिवसेनेने हिंदुत्व सोडले असल्याची टीका भाजपकडून सातत्याने करण्यात येत होती. अशातच एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर हे संबंध आणखी तणावाचे बनले. याच बिघडलेल्या संबंधांचा परिणाम राजनाथ सिंह आणि उद्धव ठाकरे यांच्या फोनदरम्यान दिसून आला होता.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आज मातोश्रीवर शिवसेनेच्या सर्व माजी आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीसाठी ३५ माजी आमदार उपस्थित होते. यावेळी ठाकरे यांनी माजी आमदारांना तयारीला लागण्याचे आदेश दिले. "संघर्षाची तयारी ठेवा सगळ्यांना पुन्हा एकदा लढायचं आहे, आता, आपली वारंवार बैठक ही होणार आहे आणि तुमचे मूळ प्रश्न आम्ही सोडवणार आहे, असेही आश्वासन ठाकरे यांनी माजी आमदारांना दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in