हनुमान जयंतीच्या मिरणूकीवरील हल्ल्याबाबत संजय राऊतांचा गौप्यस्फोट

Sanjay Raut| Hanuman jayanti| राजधानी दिल्लीत शनिवारी हनुमान जयंतीनिमित्त आयोजित मिरवणूकीवर काही समाज कंटकांनी हल्ला केला.
हनुमान जयंतीच्या मिरणूकीवरील हल्ल्याबाबत संजय राऊतांचा गौप्यस्फोट
Sanjay Raut on Delhi voilence

मुंबई : ''राजकीय फायद्यांसाठी, निवडणूका जिंकण्यासाठी तुम्ही जे करत आहात ते देशासाठी घातक आहे. कालही दिल्लीत हमुनान जयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणूकीवर जो हल्ला झाला, तसा यापूर्वी कधीही झाला नव्हता. पण आज देशात निवडणूका (Election) जिंकण्यासाठी जाणीवपूर्वक देशातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे, काल दिल्लीत (Delhi) मिरवणूकीवर झालेला हल्ला हो पूर्वनियोजित होता.'' असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला.

राजधानी दिल्लीत शनिवारी हनुमान जयंतीनिमित्त आयोजित मिरवणूकीवर काही समाज कंटकांनी हल्ला केला. या घटनेवर बोलताना त्यांनी विरोधकांवर सडकून टिका केली. ''कालचा हल्ला हा राजकीयदृष्ट्या प्रेरित होता. देशात पुन्हा हिंदू मुसलमान दंगे व्हावेत, असे वातावरण तयार केले जात आहे. कारण आता निवडणूकांमध्ये भारत पाकिस्तान चालणार नाही, सर्जिकल स्ट्राईक, राममंदिर चालणार नाही. म्हणून देशातील चार-पाच राज्यातील आगामी निवडणूकांच्या दृष्टीने मतांच्या दृष्टीने देशातील वातावरण बिघडवण्याचे षडयंत्र सुरु, असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.

Sanjay Raut on Delhi voilence
आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा: बालेकिल्ल्यात जाऊनच भाजपला हिंदूत्त्वावर देणार उत्तर

याच वेळी त्यांनी महाराष्ट्रातील परिस्थितीवरही भाष्य केले. "महाराष्ट्रातही मुंबईपासून राज्यातील अनेक भागात रामनवमी, हनुमान जयंतीच्या दिवशी शांतता भंग करण्याचा प्रयत्न झाला, दंगली भडकवण्याचा प्रयत्न केला गेला, पण महाराष्ट्रातील जनता आणि पोलीस संयमी आहेत. भगवान श्रीराम आणि हनुमान यांच्या नावाखाली महाराष्ट्रातली शांतता भंग करण्याचा, दंगे भडकावण्याचा येथील नव हिंदू, नव्या ओवेसींचे मिशन होते. पण आम्ही तसे होऊ दिले नाही, आणि यापुढेही होऊ देणार नाही, असा विश्वासही राऊतांनी व्यक्त केला.

तसेच, देशभरात सुरु असलेल्या या सामाजिक, धार्मिक तणावाबाबत देशातील १३ विरोधी पक्षनेत्यांनी पंतप्रधान यांना निवेदन केले आहे. पंतप्रधान या घटनांवर शांत का आहेत, असी विचारणा या नेत्यांनी पत्रातून केली आहे. जर देशातील १० राज्यामंध्ये रामनवमीला दंगे होत असतील तर देशाच्या पंतप्रधानांनी समोर येऊन जनतेला आवाहन केले पाहिजे. सामजिक सलोखा, राष्ट्रीय एकतेवर बोलायला हवे, जर पंतप्रधानांचे या हिंसेला समर्थन नसेल तर त्यांनी समोर येऊन जनतेशी बोलले पाहिजे,

महाराष्ट्रातले ओवेसी कोण आहेत हे काही हजार भोंग्यावरून स्पष्ट झाले, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना टोला लगावला. या विषयावर ते सरकार सोबत चर्चा होऊ शकत होते, सुप्रीम कोर्टाचे काही निकाल आहेत त्यावरता काही कार्यवाही सुरू आहे, असे असताना फक्त या राज्यात अशांतता आणि अस्थिरता निर्माण करून भारतीय जनता पक्षाच्या मनातली राष्ट्रपती राजवट निर्माण करणारी स्थिती निर्माण करणे, यासाठी हे भुंग्याचे राजकारण सुरु होतं, पण काल कोल्हापूरच्या निकालातून स्पष्ट झाले, असेही यावळी संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.