भाजप-मनसे युतीच्या चर्चा: संदीप देशपांडे म्हणाले, स्पष्टच सांगतो...

BJP-MNS Alliance| Raj Thackeray| Nitin Gadkari| गुडीपाडवा मेळाव्यानंतर झालेल्या नितीन गडकरी आणि राज ठाकरे यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत.
BJP-MNS Alliance|
BJP-MNS Alliance| Sarkarnama

मुंबई : भाजपचे वरिष्ठ नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ( nitin gadkari)यांनी रविवारी राज ठाकरेंची ( raj thackeray) मुंबईत भेट घेतली. या भेटीनंतर राजकारण तापलं आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे-भाजपची युती होणार का? याबाबत चर्चा रंगल्या आहेत.

या चर्चांच्या पार्श्वभुमीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. ट्विट करत त्यांनी भाजप-मनसे युतीच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. "एक तर गोष्ट स्पष्ट आहे की भाजप मनसे युतीचा सध्या कुठलाही प्रस्ताव नाही भविष्यात काय होईल माहीत नाही. पण मनात प्रश्न येतो शिवसेना,राष्ट्रवादी यांनी लोकसाक्षीने व्याभिचार केला तरी यांना प्रश्न विचारायचे नाहीत आणि आमच्या अफवा उठल्या तरी यांना मिरच्या झोंबतात हे फारच झालं." असं म्हणत त्यांनी या चर्चांवर भूमिका स्पष्ट केली.

BJP-MNS Alliance|
पहाटेचा शपथविधी चालतो, गडकरींसोबत जेवण केलं, तर तुम्हाला मळमळ होते ? मनसेचा सवाल

दरम्यान, गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी ज्या प्रकारे महाविकास आघाडी सरकारवर केलेला हल्लाबोल आणि भाजप संदर्भात सॉफ्ट कॉर्नर दिसून आला. येत्या काळात होणाऱ्या निवडणुका लक्षात घेता नितीन गडकरी आणि राज ठाकरे यांच्या भेटीमुळे विविध चर्चा रंगत आहे त्यामुळे या दोन्ही नेत्यांच्या भेटीलाही महत्त्व प्राप्त झालं आहे.

ठाकरे-गडकरी यांच्यात जवळपास दोन तास बैठक होते. स्वाभाविकच या भेटीत राजकीय चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. नितीन गडकरी यांनी जरी ही राजकीय भेट नाही असं म्हटलं आहे, तरी या दोन तासांच्या बैठकीत त्यांच्यात राजकीय चर्चा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. या भेटीबाबत गडकरी म्हणाले, "ही भेट पूर्णपणे व्यक्तिगत आणि कौंटुंबिक भेट होती. या भेटीचा राजकारणाशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही".

मात्र, तसे असले तरी या भेटीला केवळ कौटुंबिक भेट म्हणता येणार नाही. कारण, गेल्या काही दिवसांत राज ठाकरेंची हिंदूत्वाच्या संदर्भात घेतलेली भूमिका महत्त्वाची आहे. यासोबतच मनसे आणि भाजप यांची आगामी मुंबई मनपाच्या निवडणुकांत युती होण्याचीही गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com