
Chennai News : तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी यांनी सनातन धर्माबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून वाद अजूनही थांबलेला नाही. त्यातच आता त्यांच्याच द्रमुक पक्षाचे मोठे नेते ए. राजा यांनीही सनातन धर्माबाबत आक्षेपार्ह टीपण्णी केली आहे. उदयनिधी यांच्या वक्तव्याचे समर्थन करतानाचा सनातनबाबत त्यांनी वादग्रस्त विधाने केली आहेत. सनातनची तुलना एचआयव्ही एड्स आणि कुष्ठरोग यांसारख्या आजारांशी करायली हवी, असे ए. राजा म्हणाले आहेत. त्यामुळे या वादाचा भडका आणखी जास्तच उडण्याची चिन्हे दिसत आहेत. (Latest Marathi News)
द्रमुक नेत्यांनी सनातन धर्मावर चालवलेल्या आक्षेपार्ह विधानांबाबत भाजप आक्रमक झाली असून, याचे आता देशभरातच तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे. एकीकडे भाजपची आक्रमक भूमिका आणि दुसरीकडे उदयनिधी आणि त्यांचे नेते वक्तव्यावर ठाम राहणे, यामुळे हा वाद पेटण्याची शक्यता आहे.
पुदुचेरी येथे एका कार्यक्रमाला संबोधित करत असताना ए. राजा म्हणाले, "आम्ही सनातन धर्म संपवला म्हणून अमित शाह गृहमंत्री झाले. साई सुंदरराजनही यामुळे राज्यपाल झाले. ए. राजा यांनी अमित शाह यांना सनातन धर्माबाबत केलेल्या विधानांवर थेट चर्चेचे आव्हानही दिले. "त्यांची इच्छा असेल तर ते दिल्लीत कोणत्याही ठिकाणी खुली चर्चा करू शकतात. एक लाख लोकांना बोलावून चर्चा करा. कोण बरोबर हे जनता ठरवेल," अशा शब्दात ए. राजा यांनी शाह यांना आव्हान दिले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.