Sameer Wankhede : राष्ट्रवादीच्या नवाब मलिकांनी आरोप केलेल्या समीर वानखेडेंना उच्च न्यायालयाचा मोठा दणका!

Sameer Wankhede : "माझ्या संपत्तीवर जप्ती आणू नये."
Sameer Wankhede
Sameer Wankhede Sarkanama

Sameer Wankhede : अभिनेते शाहरूख खान यांचा मुलगा आर्यन खान याच्या कथित ड्रग प्रकरण हाताळणारे मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) यांना दणका दिला आहे. वानखेडे यांच्याकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायालयाने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. वानखेडे यांच्यावर बेहिशोबी मालमत्ता असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आले होते. आपल्या संपत्तीवर कसलीही कारवाई होण्यापूर्वी, कागदपत्रे व पुरावे सादर करण्यात वेळ देण्यात यावा अशी वानखडे यांनी मागणी केली होती.

न्यायमूर्ती अनुप जयराम भंभानी यांनी वानखेडे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणी करण्यास नकार दिला. कारण - वानखेडे यांच्यावरील आरोपांबाबत संबंधित गोष्टी या न्यायालयात मांडण्यात असमर्थ ठरले आहेत. आता न्यायालयाने वानखेडेंची याचिका फेटाळून लावत, त्यांना जोरदार दणका दिला आहे.

न्यायालयात काय़ घडलं?

वानखेडेंच्या वकिलांनी म्हंटले की, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने वानखेडे यांच्याकडे बेहिशोबी संपत्ती बाबत आरोप करून आपल्या 'अधिकारक्षेत्राशिवाय' विभागातून परतल्यानंतर अहवाल तयार करण्यात आला आहे. मात्र यामध्ये प्रशासकीय न्यायाधिकरणाने (कॅट) या प्रकरणी वानखेडे यांच्या बाजू्ची भूमिका घेतल्याचे म्हंटले आहे.

'मी चौकशीला कधीही समोर जावू शकतो. कसलीही अडचण नाही. माझ्याकडे असलेली सर्व संपत्ती सरकारी सेवेत येण्यापूर्वीपासूनच आहेत. माझ्या संपत्ती जप्तीच्या कक्षेत घेऊ नये. तत्पूर्वी आपल्याला कागदोपत्रे व पुरावे सादर करण्यास पुरेसा वेळ मिळावा , असे वानखेडेंच्या वकीलांनी म्हंटले.

Sameer Wankhede
Sanjay Raut; तर मुख्यमंत्र्यांनी दारावर लाथ मारून राज्यपालांना जाब विचारला असता!

या युक्तिवादावर न्यायमूर्ती भंभानी म्हणाले, “ आता तुमची पोस्टिंग मुंबईत शहरातच आहे. आता तुम्ही ज्या विभागात कार्यरत आहात, ज्या कार्यालयात तुम्ही रूजू आहात , ते ही मुंबईतच आहे, तर तुम्ही दिल्लीच्या न्यायालयात का आला आहात?"

यावर वानखेडेंच्या वकिल म्हणाले, NCB आणि CBI चे मुख्यालय, गृह आणि वित्त मंत्रालयं राष्ट्रीय दिल्लीतच आहे. या याचिकेवर सुनावणी घेण्याचे अधिकार न्यायालयाला आहेत. वानखेडेंची एक चांगली आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळख आहे. आणि ते नियम आणि कायद्याचे पालन करणारे जबाबदार नागरिक आहेत.

Sameer Wankhede
Shivajirao Adhalarao Patil News : गेल्या सहा महिन्यांपासून बळ आले; २०२४ ला पुन्हा दंड थोपटणारच : आढळराव पाटील

यावर न्यायमूर्ती भंभानी म्हणाले, 'हे सर्व सन्मानाचे प्रमाणित आहेत. आहेत जे तुम्ही स्वत:च स्वतःलाच देत आहात. याबद्दल आम्हाला माहित नाही.'या प्रकरणात अधिकार क्षेत्राचा उपयोगात आणण्यासाठी कसलेही संबंधित पुरावे त्यांच्यासमोर ठेवण्यात आलेली नाही. तुम्ही आमच्यासमोर काही पुरावे सादर करा, यानंतर काय करायचे ते पाहता येईल. एका शासनाच्या अधिकार्‍याने कशाप्रकारे वागले पाहिजे हे आपल्याला जास्त माहिती असावी.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com