अखिलेश यांच्यावर नामुष्की; आझम खान यांच्या पत्नीचा पत्ता कट, तासभर आधी बदलला उमेदवार

आझम खान यांच्या पत्नी तंजीम फातिमा यांना रामपूर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी सोमवारी सकाळी उमेदवारी घोषित करण्यात आली होती.
SP Leader Azam Khan and Akhilesh Yadav Latest Marathi News
SP Leader Azam Khan and Akhilesh Yadav Latest Marathi NewsSarkarnama

लखनौ : समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर सोमवारी नामुष्की ओढवली. लोकसभेच्या पोटनिवडणुकीचे उमेदवार अर्ज भरण्यासाठी तासाभराचा कालावधी शिल्लक असताना त्यांना उमेदवार बदलावा लागला आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. (Lok Sabha Election Latest Marathi News)

पक्षातील बडे नेते आमदार आझम खान यांच्या पत्नी तंजीम फातिमा यांना रामपूर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी सोमवारी सकाळी उमेदवारी घोषित करण्यात आली होती. पण त्यानंतर वेगाने घडलेल्या घडामोडींनंतर अचानक नाव बदलण्यात आले. अखिलेश आणि आझम खान यांची सुमारे दोन तास चर्चा झाल्यानंतर उमेदवार बदलण्यात आल्याचे समजते.

SP Leader Azam Khan and Akhilesh Yadav Latest Marathi News
अखिलेश यांनी पत्नीलाच घरी बसवलं; लोकसभेच्या निवडणुकीत चुलत भावाला झुकतं माप

आझम खान यांच्या पत्नीऐवजी आता असीम रझा यांना तिकीट देण्यात आलं आहे. रझा हे सपाचे रामपूर शहराध्यक्ष आहेत. तसेच आझम खान यांचे ते निकवर्तीय आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केवळ एक तास उरलेला असताना हा बदल करण्यात आल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत.

मागील काही दिवसांपासून आझम खान आणि अखिलेश यांच्यामध्ये दरी निर्माण झाल्याची चर्चा आहे. पण खान यांच्याकडून ही चर्चा फेटाळून लावली जात आहे. आता पत्नीचा पत्ता कट करून त्यांनी रझा यांना उमेदवारी दिल्याने या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे.

SP Leader Azam Khan and Akhilesh Yadav Latest Marathi News
काँग्रेसची एका आमदारासाठी धावपळ; राज्यसभेच्या उमेदवाराचे धाबे दणाणले

डिंपल यादव यांचा बसवलं घरी

राज्यसभेपाठोपाठ लोकसभेच्या पोटनिवडणुकीतही अखिलेश यांनी पत्नी डिंपल यांना उमेदवारी नाकारली आहे. त्यांच्याऐवजी अखिलेश यांनी चुलत भाऊ व माजी खासदार धर्मेंद्र यादव यांना संधी दिली आहे.

अखिलेश यादव आणि आझम खान यांनी विधानसभा निवडणुकीत विजयानंतर खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे अनुक्रमे आझमगड आणि रामपूर लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. त्याआधी डिंपल यादव यांची राज्यसभेची मुदत संपत असल्याने त्यांना पुन्हा राज्यसभेत पाठवले जाईल, अशी शक्यता होती. पण त्यांच्याजागी अखिलेश यांनी सहकारी पक्ष असलेल्या राष्ट्रील लोक दलाचे (RLD) प्रमुख जयंत चौधरी (Jayant Chaudhary) यांना उमेदवारी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com