राजकारण पेटलं! उमेदवारी मिळण्याआधीच बड्या नेत्याची हत्या

उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) या वर्षाच्या सुरवातीला विधानसभा निवडणूक (Assembly Election) होत आहे.
राजकारण पेटलं! उमेदवारी मिळण्याआधीच बड्या नेत्याची हत्या

Firoz Pappu 

Sarkarnama

लखनौ : उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) या वर्षाच्या सुरवातीला विधानसभा निवडणूक (Assembly Election) होत आहे. या निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. समाजवादी पक्षाचे नेते फिरोज पप्पू (Firoz Pappuy) यांची घरासमोरच हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. तुलसीपूरमधून विधानसभा निवडणुकीसाठी पप्पू यांचे नाव आघाडीवर होते. पप्पू यांच्या हत्येने निवडणुकीच्या तोंडावर हिंसाचार उसळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

या घटनेनंतर समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी यांनी तातडीने सर्व प्रचारसभा रद्द केल्या असून, गुन्हेगारांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. फिरोज पप्पू (वय 35) हे तुलसीपूर नगर पंचायतीचे माजी अध्यक्ष आहेत. ते रात्री घरी परतत असताना काल रात्री (ता.4) त्यांची गळा चिरून हत्या करण्यात आली.

<div class="paragraphs"><p>Firoz Pappu&nbsp;</p></div>
भाजपला लवकरच दे धक्का ! केंद्रीय मंत्र्यांसह 9 आमदार पक्ष सोडण्याच्या वाटेवर

विशेष म्हणजे पप्पू यांच्या पत्नी सध्या तुलसीपूर नगर पंचायतीच्या अध्यक्षा आहेत. घराजवळच पप्पू यांची हत्या करण्यात आल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस उपमहानिरीक्षकांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले आहेत. याचबरोबर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

<div class="paragraphs"><p>Firoz Pappu&nbsp;</p></div>
भाजपला मोठा धक्का! केंद्रीय मंत्र्याची अधिकृत ग्रुपमधून एक्झिट

निवडणुकीचा प्रचार संपवून पप्पू हे घरी परतत असताना त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. नातेवाईकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात हलवले. परंतु, रुग्णालयात पोचण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. पप्पू यांच्या हत्येची माहिती मिळताच समाजवादी पक्षाचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने तेथे जमा झाले आहेत. पप्पू यांची हत्या होताच तुलसीपूर सगळी दुकाने बंद झाली असून, शहरात बंदसदृश वातावरण आहे. तुलसीपूर विधानसभा मतदारसंघातून समाजवादी पक्षाकडून पप्पू यांचे नाव आघाडीवर होते. त्यांची हत्या करणाऱ्या गुन्हेगारांना शोधण्यासाठी चार पोलीस पथके नियुक्ती करण्यात आली आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in