'सपा'ला जमलं नाही ते राष्ट्रवादी करून दाखवणार? थेट भाजपशी टक्कर

समाजवादी पक्षाने उत्तर प्रदेशात राष्ट्रवादीला अनूपशहर हा मतदारसंघ सोडला आहे.
Sharad Pawar, Akhilesh Yadav
Sharad Pawar, Akhilesh YadavSarkarnama

लखनौ : उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या (UP Election 2022) मैदानात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही (NCP) उतरणार आहे. समाजवादी पक्षासोबत (SP) आघाडी केल्याची घोषणा पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मंगळवारी केली आहे. त्यानंतर अनूपशहर मतदारसंघातून राष्ट्रवादीचा उमेदवारही जाहीर करण्यात आला आहे. सपानेही ही जागा राष्ट्रवादीसाठी सोडली आहे. या जागेवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराची टक्कर भाजपशी होणार आहे.

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस के. के. शर्मा (K. K. Sharma) हे निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. त्यांना अनूपशहर (Anupshahar) मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. समाजवादी पक्षाकडून त्यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे. हा मतदारसंघ सध्या भाजपच्या ताब्यात आहे. तर मागील दोन टर्म बहूजन समाज पक्षाचे उमेदवार निवडून आले होते.

Sharad Pawar, Akhilesh Yadav
उपमुख्यमंत्री भडकले; माईक फेकून देत पत्रकाराचा मास्क ओढला अन् व्हिडीओच केला डिलीट

राष्ट्रवादीसाठी सोडण्यात आलेला अनूपशहर मतदारसंघा 'सपा'साठी नेहमीच कठीण राहिला आहे. या मतदारसंघातून एकदाही अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांचा उमेदवार निवडून आलेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीसाठी ही निवडणूक सोपी असणार नाही. 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत विद्यमान आमदार के. संजय यांना तब्बल 1 लाख 12 हजार मते मिळाली होती. एकूण मतदानाच्या तुलनेत ही टक्केवारी 49.28 टक्के एवढी होती.

2017 च्या निवडणुकीत बसपाचा उमेदवार दुसऱ्या तर सपाचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होता. सपाच्या उमेदवाराला 48 हजार मते मिळाली होती. त्याआधी 2007 च्या निवडणुकीतही सपा तिसऱ्या क्रमांकावर होता. तर 2012 मध्ये दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती. हा पक्ष 2002 मध्ये मतदारसंघात थेट पाचव्या क्रमांकावर फेकला गेला होता. त्यामुळे सपाला एकदाही चमक दाखवता आलेली नाही.

Sharad Pawar, Akhilesh Yadav
वाद पेटला! आव्हाड भडकले अन् थेट आमदार महेश शिंदेंची लाज काढली

मागील निवडणूकीत भाजपच्या (BJP) उमेदवाराला मिळालेली मतं पाहता राष्ट्रवादीच्या के. के. शर्मा व सपाला खूप परिश्रम करावे लागणार आहे. केवळ भाजपच नव्हे तर बसपाशीही टक्कर द्यावी लागणार आहे. दरम्यान, लवकरच समाजवादीचे प्रमुख अखिलेश यादव जागा वाटप जाहीर करतील, असे संकेत राष्ट्रवादीचे प्रवक्त नवाब मलिक यांनी दिले. या आघाडीमध्ये सुहेलदेव भारतीय समाज पार्टी, महान दल, राष्ट्रीय लोक दल, जनवादी पार्टी, प्रगतीशील समाजवादी पार्टी आणि अपना दल-कमेरावादी या पक्षांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशात राष्ट्रवादी आणखी किती जागा मिळणार, याबाबत अद्याप अस्पष्टता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in