UP Election 2022 : नेत्यांच्या दबावापुढे अखिलेश यादव झुकणार; घेणार मोठा निर्णय

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजप विरूध्द समाजवादी पार्टी असा थेट सामना रंगणार आहे.
Akhilesh Yadav
Akhilesh YadavSarkarnama

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी गोरखपूर (शहर) मतदारसंघातून विधानसभा निवडणूक (Assembly elections) लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) हेही आता निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. पक्षातील नेत्यांच्या वाढत्या दबावापुढे अखिलेश झुकण्याची शक्यता आहे.

अखिलेश यादव हे सध्या आझमगडचे खासदार असून सपाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्याच खांद्यावर आहे. ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीही राहिले आहेत. पण आतापर्यंत त्यांनी एकदाही विधानसभेची निवडणूक लढलेली नाही. यावेळी निवडणूक लढणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. उत्तर प्रदेशातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात लक्ष देता यावे, यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

Akhilesh Yadav
UP Election 2022 : मुलायमसिंहांच्या घरात फूट; सूनबाईंचा भाजप प्रवेश?

योगी आदित्यनाथ हेही पहिल्यांदाच विधानसभेच्या आखाड्यात उतरत आहेत. त्यामुळे अखिलेश यांच्यावही निवडणूक लढण्याचा दबाव वाढू लागला आहे. पक्षातील नेते व कार्यकर्त्यांकडून दबाव वाढू लागला आहे. यापार्श्वभूमीवर ते निवडणूक लढवू शकतात, असं पक्षातील सुत्रांनीच सांगितले. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. मतदारसंघ निश्चित झाल्यानंतर त्याची घोषणा केली जाऊ शकते.

अखिलेश हे निवडणुकीच्या मैदानात उतरल्यास त्यांच्यावर प्रचारासाठी मर्यादा येऊ शकतात. त्यासाठी त्यांना सुरक्षित मतदारसंघ शोधावा लागणार आहे. ते मैदानात आल्यास कार्यकर्ते व नेत्यांमध्ये उत्साह संचारेल, अशी आशा नेत्यांना असल्याचेही सुत्रांनी सांगितले. दरम्यान, योगींनी गोरखपूरमधून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याने तेथील विद्यमान भाजप आमदार राधामोहन अगरवाल यांचा पत्ता कट झाल्याचे मानले जात आहे.

अखिलेश यादवांनी अगरवाल यांना खुली ऑफर दिली आहे. त्यांनी म्हटले होते की, पत्रकारांनी अगरवाल यांच्याशी संपर्क साधावा आणि त्यांच्याशी बोलावे. त्यांना आम्ही गोरखपूरमधून तिकिट जाहीर करतो. त्यांना हे तिकिट नक्की मिळेल. योगी आदित्यनाथ यांचा मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी मला अजूनही आठवतो. अगरवाल यांना बसायला जागा मिळाली नव्हती. त्यामुळे त्यांना उभेच राहावे लागले होते. भाजप सरकारच्या काळात सर्वाधिक अपमानित होणारे अगरवालच आहेत.

भाजपने (BJP) आज उत्तर प्रदेशातील 107 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात योगी हे गोरखपूर (शहर) मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. गोरखपूर हा योगींचा बालेकिल्ला आहे. त्यांनी गोरखपूर लोकसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा विजय मिळवला आहे. पक्षाच्या नेतृत्वाने सगळ्यांशी विचारविनिमय करून योगींना गोरखपूरमधून उभे करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com