'यूपी'च्या राजकारणात खळबळ; पराभवाच्या धक्क्यानंतर अखिलेश यांनी उचललं मोठं पाऊल

लोकसभेच्या पोटनिवडणुकीत 'सपा'चा धक्कादायक पराभव झाला आहे.
Akhilesh Yadav Latest Marathi News
Akhilesh Yadav Latest Marathi NewsSarkarnama

लखनौ : उत्तर प्रदेशात नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपने समाजवादी पक्षाला धूळ चारली. रामपूर आणि आझमगड या बालेकिल्ल्यातच पराभव झाल्याने पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना मोठा धक्का बसला. त्यानंतर आता काही दिवसांतच अखिलेश यांनी मोठं पाऊल उचललं आहे. (Uttar Pradesh Latest Marathi News)

उत्तर प्रदेशचे सपाचे (Samajwadi Party) प्रदेशाध्यक्ष वगळून अखिलेश (Akhilesh Yadav) यांनी पक्षाच्या सर्व विभागांची कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. पक्षाकडून ट्विटरवरून ही माहिती देण्यात आली आहे. पक्षाची सर्व युवक संघटना, महिला विभाग व अन्य सर्व विभागांचे राष्ट्रीय अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष, जिल्हाध्यक्षांसह राष्ट्रीय, राज्य, जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केल्याचे त्यामध्ये म्हटलं आहे.

उत्तर प्रदेश सपाचे अध्यक्ष नरेश उत्तम पटेल यांचं पद मात्र शाबूत ठेवण्यात आलं आहे. त्यानंत सोडून राज्य व राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. पण याबाबत पक्षाकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.

विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाला लोकसभेच्या पोटनिवडणुकीत पराभव पत्करावा लागल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. रामपूर व आझमगड हे दोन्ही मतदारसंघ सपाचे बालेकिल्ले मानले जात होते. पण पोटनिवडणुकीत भाजपने दोन्ही गडांना सुरूंग लावला. दोन्ही जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत.

त्यामुळे आता पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी म्हणून सर्व कार्यकारिणी बरखास्त केल्याची चर्चा आहे. पक्ष संघटनेची नव्याने बांधणी करण्याच्या उद्देशाने अखिलेश यांनी हा निर्णय घेतल्याचे पक्षातील नेत्यांकडून सांगितले जात आहे. विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला 255 आणि सपाला 111 जागा निवडून आल्या होत्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com