असंही राजकारण! बायकोला तिकीट नाकारून सहकारी पक्षाला राज्यसभेची जागा

राष्ट्रील लोक दलाचे प्रमुख जयंत चौधरी यांना राज्यसभेची उमेदवारी
Jayant Chaudhary and Akhilesh Yadav
Jayant Chaudhary and Akhilesh Yadav Sarkarnama

लखनौ : समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी सहकारी पक्ष असलेल्या राष्ट्रील लोक दलाचे (RLD) प्रमुख जयंत चौधरी (Jayant Chaudhary) यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. ते समाजवादी पक्ष आणि राष्ट्रील लोक दलाचे संयुक्त उमेदवार असतील. विशेष म्हणजे, चौधरी यांच्यासाठी अखिलेश यादव यांनी त्यांच्या पत्नी डिंपल यांना उमेदवारी नाकारली आहे. दरम्यान, काँग्रेसला दहा दिवसांपूर्वीच सोडचिठ्ठी देणाऱे कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनीही समाजवादी पक्षाच्या पाठिंब्यावर राज्यसभेसाठी अर्ज दाखल केला आहे. (Rajya Sabha Election Latest News)

समाजवादी पक्षासोबत आघाडी करून राष्ट्रीय लोक दलाने विधानसभा निवडणूक लढवली होती. आता राज्यसभेसाठी समाजवादी पक्षाकडे तीन जागा आहेत. तिसऱ्या जागेवर अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांचे नाव चर्चेत होते. यामुळे जयंत चौधरी हे नाराज झाले होते. अखेर अखिलेश यादव यांनी पत्नीची उमेदवारी रद्द करून चौधरींना मैदानात उतरवले आहे. आज सकाळीच खुद्द अखिलेश यांनी फोन करून चौधरींना ते राज्यसभेची उमेदवार असतील, ही माहिती दिली.

Jayant Chaudhary and Akhilesh Yadav
अखेर सिद्धूला कारागृहात काम मिळालं पण सुरक्षेच्या कारणास्तव 'वर्क फ्रॉम कोठडी'

सिब्बल यांनी 16 मे रोजीच काँग्रेसचा राजीनामा दिला असल्याचा गौप्यस्फोट काल (ता.25) माध्यमांशी बोलताना केला आहे. काल सकाळी त्यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासह पक्षाच्या प्रमुख नेत्यांसह उत्तर प्रदेशातून राज्यसभेसाठी अर्ज दाखल केला. सिब्बल यांनी नुकतीच लखनौमध्ये अखिलेश यांची भेट घेतली होती. त्यांनी पक्षाचे नेते आझम खान यांच्या जामीनासाठी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली होती. खान यांना नुकताच अंतरीम जामीन मिळाला आहे. अखिलेश यांच्या या भेटीतच राज्यसभेची उमेदवारी निश्चित झाल्याचे मानले जात आहे.

Jayant Chaudhary and Akhilesh Yadav
भाजपनं तिसऱ्यांदा मुलाला तिकीट नाकारताच येडियुरप्पा म्हणाले...

उत्तर प्रदेशात पुढील महिन्यात राज्यसभेच्या 11 जागांसाठी मतदान होत आहे. यावेळी समाजवादीच्या जागा वाढल्याने त्यांची राज्यसभेत तीन जागा मिळणार आहेत. त्यामुळे सिब्बल यांना संधी देण्यात आली आहे. तर काँग्रेसकडून सिब्बल यांना राज्यसभेत पुन्हा पाठवण्याची अजिबात शक्यता नव्हती. त्यामुळे सिब्बल यांनी समाजवादीच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com