साईबाबांचा चमत्कार झाल्याचा वनमंत्र्यांचा दावा ; म्हणाले, "बाबांचे स्मरण करताच टेबलावर आढळले.."

Tej Pratap Yadav : तेज प्रताप यांनी साई बाबा आणि भगवान श्रीकृष्ण यांचा त्यांच्यावर आशीर्वाद असल्याचे वर्णन व्हिडिओमध्ये केले आहे.
Tej Pratap Yadav
Tej Pratap Yadav sarkarnama

नवी दिल्ली : बिहारचे वन आणि पर्यावरण मंत्री तेजप्रताप यादव (Tej Pratap Yadav) सध्या समाज माध्यमांवर चर्चेत आहे, त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. तेजप्रताप यादव यांनी आपल्यासोबत साईबाबांचा चमत्कार झाल्याचा दावा केला आहे. यावरुन नेटकऱ्यांमध्ये उलट-सुलट चर्चा रंगल्या आहेत.

तेजप्रताप यादव हे राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसवा लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav)यांचे मोठे चिरंजीव आहेत. त्यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून हा दावा केला आहे. "मी घरी साई बाबांची मालिका पाहत होते. साईबाबा खरोखर चमत्कार करतात की नाही हे मला पाहायचे होते. साई बाबा लोकांचे आजार आणि समस्या भस्माने दूर करत असल्याचे दाखवले जात होते.मी बाबांचे मनापासून स्मरण केले आणि त्यांना भेटावेत अशी इच्छा व्यक्त केली,"

त्यानंतर तेज प्रताप बुधवारी त्यांच्या घरी बांधलेल्या कार्यालयात गेले असता त्यांना टेबलावर साईबाबांच्या भभूताचे (भस्म) पाकीट आढळले. हे पाहून ते थक्क झाले. तेज प्रताप यांनी साई बाबा आणि भगवान श्रीकृष्ण यांचा त्यांच्यावर आशीर्वाद असल्याचे वर्णन व्हिडिओमध्ये केले आहे.

Tej Pratap Yadav
PCMC : पवारांनी आणलेल्या पालिका आयुक्तांच्या आदेशाला शिंदे सरकारच्या आयुक्तांकडून केराची टोपली

तेजप्रताप म्हणाले, माझ्या आयुष्यात मी असा चमत्कार पाहिला नाही. हा चमत्कार पाहिल्यानंतर हे स्पष्ट झाले आहे की साईबाबा खरचं देव आहेत. मी मालिका पाहताना त्यांच्याकडे भस्म देण्याची त्यांच्याकडे प्रार्थना केली होती,"

तेजप्रताप यादव हे नेहमी विविध कारणामुळे चर्चेत असतात. पक्षाच्या कार्यकारीणीच्या बैठकीतून ते निघून गेल्यामुळे ते काही दिवसापूर्वी चर्चेत होते. एका ज्येष्ठ नेत्याने आपल्याला शिवी दिली होती, असा आरोप त्यांनी केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com