हिंदूंनी 4 मुले जन्माला घालावीत- साध्वी ऋतंभरा

HIndu-muslim Politics रामभक्त होण्यासाठी रामत्व आत्मसात करावे लागते,
हिंदूंनी 4 मुले जन्माला घालावीत- साध्वी ऋतंभरा
sadhvi ritambhara

कानपूर : साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्यानंतर आता साध्वी ऋतंभरा यांनीही असेच वादग्रस्त विधान केले आहे. हिंदूंनी (Hindu) 2 मुलांच्या विचारातून बाहेर पडून किमान 4 मुलांना जन्म द्यायला हवा, असे विधान साध्वी ऋतंभरा यांनी केले आहे.

उत्तर प्रदेशातील कानपूर येथील निराला नगर येथील रेल्वे मैदानावर विश्व हिंदू परिषदेच्या (विहिंप) वतीने रामोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. रामोत्सव कार्यक्रमाला संबोधित करताना साध्वी ऋतंभरा म्हणाल्या, 'प्रत्येक हिंदूने आता ४ मुलांना जन्म द्यायला हवा. दोन मुले कुटुंबासाठी ठेवावीत आणि दोन मुले राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि विश्व हिंदू परिषद यांच्याकडे सोपवावीत जेणेकरून ते राष्ट्रीय यज्ञात योगदान देऊ शकतील. आपल्यासाठी राष्ट्र हे सर्वोत्कृष्ट असले पाहिजे.

sadhvi ritambhara
कर्नाटकच्या राजकारणात राष्ट्रवादी ताकद वाढवणार; पवारांच्या उपस्थितीत आज शक्तिप्रदर्शन

रामोत्सवात हजारो श्रीराम रूपांची पूजा करण्यात आली. या सुंदर प्रसंगी रामाचे भक्त होणे ही भाग्याची गोष्ट आहे. रामभक्त होण्यासाठी रामत्व आत्मसात करावे लागते, कारण राम हे अपराजित पौरुषाचे प्रतीक आहे, असही साध्वी ऋतंभरा यांनी म्हटलं. साध्वी ऋतंभरा यांना त्यांच्या विधानाने देशात गोंधळ निर्माण होऊ शकतो, असे सांगण्यात आले तेव्हा त्या म्हणाल्या की. आम्ही हिंदूना आधीच इशारा दिला आहे, आता गोंधळ उडणार असेल तर उडू द्या, असेही ऋतंभरा यांनी म्हटले आहे.

या कार्यक्रमात विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय सरचिटणीस मिलिंद परांडे यांनीही कथित लव्ह जिहादच्या प्रकरणांवर भाष्य केले. 'एकेकाळी सीता मातेच्या अपहरणामुळे रावणाचा संपूर्ण नाश झाला होता आणि आज लव्ह जिहाद करणार्‍यांचा समूळ नायनाट करायचा आहे, ठेचून काढायचे आहे, फक्त रामाची पूजा करून काही होणार नाही, असे मिलिंद परांडे यांनी स्पष्ट केले.

रामोत्सवात रामजन्मभूमीशी संबंधित रामविलास वेदांती म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे उलटली, मात्र एवढ्या वर्षांत काँग्रेस पक्ष रामराज्य आणू शकला नाही. 2019 मध्ये जेव्हा मोदींचे सरकार आले आणि सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला, तेव्हा आम्हाला समजले की तिथे राम मंदिर कायम राहणार आहे, आणि ज्या ठिकाणी कारसेवकांनी ती वास्तू पाडली होती, ती वास्तू जबरदस्तीने बांधली गेली होती, कारण तिथे रामाची उपस्थिती आधीच होती. त्याची नोंद झाली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.