राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यासाठी मोदींना साकडे; कंचन गिरींनी लिहिले पत्र!

भारतीय जनता पक्षाचे खासरदार ब्रजभूषण शरण सिंह यांना आवर घालण्याची केली मागणी
Raj Thackeray News, Sadhvi kanchan giri News, MNS Chief Raj Thackeray News
Raj Thackeray News, Sadhvi kanchan giri News, MNS Chief Raj Thackeray NewsSarkarnama

नवी दिल्ली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे ५ जून रोजी अयोध्येत (Ayodhya) राजकारण करण्यासाठी येत नसून प्रभू रामाच्या दर्शनासाठी येत आहेत. रामनगरी अयोध्येत आपण स्वतः त्यांचे स्वागत करू. त्यांना विरोध करणारे भाजप खासदार ब्रजभूषण शरण सिंह (Brajbhushan Sharan Singh) यांना आवरावे, अशा मागणीचे पत्र महाकाल मानव सेवा संस्थेच्या साध्वी कंचन गिरी (Sadhvi Kanchan Giri) व अन्य साधू महंतांनी यांनी पंतप्रधान कार्यालयाला पाठविले आहे. (Sadhvi Kanchan Giri wrote a letter to Narendra Modi for Raj Thackeray's visit to Ayodhya)

राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांवर मनसेकडून मुंबईत झालेल्या हल्ल्यांबाबत आपल्याजवळ यापूर्वी बोलताना दिलगिरी व्यक्त केली. मात्र, आता केवळ ब्रजभूषण यांच्यासारख्या कलंकित व्यक्तीने मागणी केली; म्हणून ते अजिबात माफी मागणार नाहीत, असाही दावाही त्यांनी केला आहे. (Raj Thackeray News)

Raj Thackeray News, Sadhvi kanchan giri News, MNS Chief Raj Thackeray News
आमचे पाणी पळवाल; तर सोलापुरात पाय ठेवू देणार नाही : देशमुखांचा भरणेंना इशारा

ब्रजभूषण सिंह यांनी त्यांच्या व्यक्तिगत द्वेषातून अयोध्या किंवा उत्तर प्रदेशात ठाकरे यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला तर त्यांची ‘अंडीपिल्ली‘ बाहेर काढू असा इशारा साध्वी गिरी यांनी दिला आहे. प्रभू राम हे सर्वांचे आहेत. ब्रजभूषण सिंह यांच्यासारख्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तीने रामाच्या नावाने सुरू केलेले राजकारण थांबवावे, असेही गिरी यांनी सांगितले. त्यांनी लिहीलेल्या पत्रावर महंत नवीनचंद्र महाराज, आदित्यनाथ गिरी, महाराणा प्रताप सेनेचे मनप्रीतसिंग आदींच्या सह्या आहेत.

Raj Thackeray News, Sadhvi kanchan giri News, MNS Chief Raj Thackeray News
राष्ट्रवादीचा बार फुसका; संग्राम थोपटेंसह १० जणांची ‘राजगड’वर बिनविरोध निवड!

ब्रजभूषण हे फितूर‘जयचंद' सारखे वागत आहेत, असा आरोप साध्वी गिरी यांनी केला. ब्रजभूषणसिंह औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहणाऱ्या ओवैसीबद्दल काहीही का बोलत नाहीत, असे विचारून त्या म्हणाल्या की, राज ठाकरे यांना अयोध्येला येण्याचे निमंत्रण मीच दिले आहे. त्यांच्यासह मी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही भेट घेणार आहे. हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी समान विचारांच्या नेत्यांची एकजू होणे गरजेचे आहे. ठाकरे परिवारच्या व्यक्तिगत द्वेषातून कोणी राज यांना विनाकारण विरोध करत असेल, तर त्याला उत्तर देण्यास साधूमहंत पुढे येतील.

Raj Thackeray News, Sadhvi kanchan giri News, MNS Chief Raj Thackeray News
लोकसभेला व्होट आणि नोट मिळविणाऱ्या सदाभाऊंनी अनुभवला सोलापुरी हिसका!

राज ठाकरे यांच्यात आपल्याला बाळासाहेब ठाकरे यांची छबी दिसते. बाळासाहेबांप्रमाणेच राज ठाकरे हेही हिंदू धर्मासाठी काम करत आहेत. त्यांच्या अयोध्या दौऱ्याला अयोध्येतील भाजप लोकप्रतिनिधींचाही विरोध नसताना ब्रजभूषण सिंह राजकीय कारणावरून व प्रसिद्धी मिळविण्यासाठी असा स्टंट करत असतील तर त्यांना आवरण्याचे काम पंतप्रधान व भाजपचेच नव्हे; तर भारतवर्षाचे नेते म्हणून नरेंद्र मोदी यांना करावे लागेल म्हणून आपण पंतप्रधान कार्यालयाला हे पत्र दिले आहे.

Raj Thackeray News, Sadhvi kanchan giri News, MNS Chief Raj Thackeray News
दुर्दैवी : भाटघर धरणात बुडून पाच महिलांचा मृत्यू; मुलीला वाचविण्यात यश

राज ठाकरे हे राजकारण करण्यासाठी, मते मागण्यासाठी अयोध्येत जाणार नाहीत. त्यांना विरोध करण्याचे कारण नाही. मुंबईत अनेक व्यावसायिक, उद्योजक, सरकारी अधिकारी उत्तर भारतीय आहेत. मनसेने उत्तर भारतीयांविरूध्द घेतलेल्या भूमिकेमागे, मुंबईत त्या शहराच्या क्षमतेपेक्षा जास्त झालेली गर्दी हे होते व त्यामागे उत्तर प्रदेश, बिहारमध्ये औद्योगिकीकरण वाढावे, ती राज्ये आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावीत अशी भावना होती. ब्रजभूषण यांनी खासदार म्हणून आपल्या मतदारसंघात एक तरी कारखाना सुरू केला आहे का दुसरे म्हणजे योगी आदित्यनाथ यांच्या काळात यूपीने सर्व क्षेत्रांत भरीव कामगिरी केलेली असताना राज ठाकरे यांना अयोध्येत विरोध करणे गैर आहे. ब्रजभूषण यांचा राज ठाकरे यांना विरोध असेल तर न्यायालयात जावे, असेही आव्हान साध्वी गिरी यांनी दिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com