माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना मातृशोक

Akhilesh yadav| Uttar Pradesh news| साधना या मुलायम सिंह यादव यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या.
Akhilesh yadav|
Akhilesh yadav|

नवी दिल्ली : समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायम सिंह यादव यांच्या पत्नी साधना गुप्ता यांचे आज (९ जुलै) निधन झाले. त्यांना फुफ्फुसाचा संसर्ग झाला होता. गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. काही वेळापूर्वी पती मुलायम सिंह देखील त्यांना भेटायला रुग्णालायात गेले होते.

Akhilesh yadav|
राज्याच्या विकासासाठी केंद्राची मदत, सहकार्य आणि आशीर्वाद गरजेचा, म्हणून दिल्लीत आलो...

साधना यादव या उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या सावत्र आई होत्या. साधना या मुलायम सिंह यादव यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या. साधना यादव यांच्या मुलाचे नाव प्रतीक यादव आणि सुनेचे नाव अपर्णा यादव आहे. 2003 मध्ये अखिलेश यादव यांची पहिली आई मालती देवी यांचे निधन झाल्यानंतर मुलायम सिंह यादव यांनी साधना गुप्ता यांना दुसरी पत्नी म्हणून मान्यता दिली. साधना गुप्ता यांच्यावर लखनऊमध्ये अंत्यसंस्कार होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

साधना गुप्ता यांचा जन्म औरैयाच्या बिधुना तहसीलमध्ये झाला. त्यांचे पहिले लग्न 4 जुलै 1986 रोजी फरुखाबादच्या चंद्र प्रकाश गुप्ता यांच्याशी झाले होते. प्रतिक यादव यांचा जन्म 7 जुलै 1987 रोजी झाला. यानंतर साधना गुप्ता आणि चंद्र प्रकाश यांच्या नात्यात दुरावा वाढू लागला आणि अखेर 1990 ते दोघे वेगळे झाले.

पतीपासून विभक्त झाल्यानंतरच साधना गुप्ता मुलायम सिंह यादव यांच्या संपर्कात आल्या. मात्र, 1989 मध्ये मुलायम पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांनी दुसरे लग्न केल्याच्या अफवाही पसरल्या होत्या.मात्र ही अफवा खरी ठरली असली तरी पहिली पत्नी मालती देवी यांच्या निधनानंतर काही वर्षांनी मुलायम सिंह यादव यांनी साधना गुप्ता यांना दुसरी पत्नी म्हणून मान्यता दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com