Rajasthan Politics : अशोक गेहलोतही आझादांच्या मार्गावर? सचिन पायलाट यांचे सूचक विधान

Rajasthan Politics : काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा उफाळला
Ashok Gehlot, Sachin Pilot
Ashok Gehlot, Sachin Pilotsarkarnama

Rajasthan Politics News : राजस्थानमध्ये सचिन पायलट (Sachin Pilot) विरुद्ध मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) असा काँग्रेसमधील (Congress) अंतर्गत वाद अद्यापव शमण्याचे नाव घेत नाही. २०२० मध्ये मध्य प्रदेशात झालेल्या सत्ताबदलापासून पायलट भाजपमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यापाठोपाठ राजस्थानमध्ये सचिन पायलट आणि गेहलोत यांच्यातील अंतर्गत सत्तासंघर्ष वाढतच गेला आहे.

नुकतेच पायलट यांच्या समर्थक आमदारांचे नाराजीनाट्यही राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले होते. आता राजस्थानमधील एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि मुख्यमंत्री गेहलोत यांनी एकमेकांचे कौतुक केले. त्यावरून राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आले. पायलट यांनी त्यासंदर्भात सूचक विधान केले आहे.

Ashok Gehlot, Sachin Pilot
Bharat Jodo यात्रेत नितीन राऊत गंभीर जखमी

राजस्थानच्या बासवाडा जिल्ह्यातील मानगड धाम परिसरात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी हजेरी लावली होती. या वेळी ''पंतप्रधान मोदी जगात जिथे कुठे जातात, तिथे त्यांचा सन्मान होतो, असे मत गेहलोत यांनी व्यक्त केले होते. त्यापाठोपाठ मोदींनीही त्यांचे कौतुक केले. गेहलोत आणि मी मुख्यमंत्री म्हणून एकत्र काम केले होते. ते देशातील सर्वात ज्येष्ठ मुख्यमंत्र्यांपैकी एक आहेत, असे मोदी म्हणाले. त्याशिवाय ते अनुभवी राजकारणीही आहेत, असे कौतुक मोदी यांनी गेहलोत यांचे केले होते.

पंतप्रधान मोदींनी गेहलोत यांचे कौतुक केल्याबाबत बोलताना पायलट यांनी सूचक विधान केले. ''मोदींनी काल मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले. मला वाटते हा महत्त्वपूर्ण घटनाक्रम आहे. अशाच प्रकारे पंतप्रधानांनी संसदेत गुलाम नबी आझादांचे कौतुक केले होते. त्यानंतर काय झाले हे आपण सगळ्यांनी पाहिले आहे. त्यामुळे आता पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले ही बाब विशेष असल्याचे पायलट यांनी म्हटले आहे. ही घटना आपण सहजपणे घ्यायला नको, असेही पायलट यांनी सांगितल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे.

Ashok Gehlot, Sachin Pilot
2047 पर्यंत भारत विकसित राष्ट्र म्हणून उदयास येईल : पंतप्रधानांची मोठी घोषणा

गुलाम नबी आझाद यांना काँग्रेसकडून राज्यसभेची उमेदवारी देण्यात न आल्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यानंतर त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकत स्वता:चा पक्ष स्थापन केला आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वावरही त्यांनी टीका केली होती. या सगळ्या घडामोडींच्या आधी पंतप्रधानांनी आझाद यांचे कौतुक केले होते. त्यामुळे आता गेहलोत हेही आझाद यांच्या वाटेनेच जाणार, असा सूचक इशारा पायलट यांनी दिल्याचे सांगितले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in