युक्रेनचा रशियावर 'सर्जिकल स्ट्राईक'; पहिल्यांदाच मोठं धाडस करत घडवली अद्दल

रशियानं युक्रेनवर 37 व्या दिवशीही हल्ले सुरूच ठेवले आहेत. युक्रेनकडूनही पहिल्या दिवसापासून रशियाला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
Ukrainian Helicopters Strike at Russian Oil Depot
Ukrainian Helicopters Strike at Russian Oil DepotSarkarnama

मॉस्को : रशियानं युक्रेनवर (Russia Ukraine War) 37 व्या दिवशीही हल्ले सुरूच ठेवले आहेत. युक्रेनकडूनही पहिल्या दिवसापासून रशियाला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे अजूनही युक्रेनवर पूर्ण ताबा मिळवता आलेला नाही. पण आता युक्रेनंही आक्रमक झालं असून शुक्रवारी या देशानं मोठं धाडस केलं. युक्रेनच्या दोन हेलिकॉप्टर्स रशियात (Russia) घुसून हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात रशियातील ऑईल डेपो उद्धस्त झाल्याचे समजते. (Surgical Strike)

रशिया-युक्रेन सीमेपासून 40 किलोमीटर अंतरावरील बेलगोरोडजवळील ऑईल डेपोला मोठी आग लागली आहे. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दोन युक्रेनियन (Ukraine) हेलिकॉप्टरने हल्ला केल्यानंतर ही आग लागली, असा दावा रशियाकडून करण्यात आला आहे. या घटनेचे काही व्हि़डीओही सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. पण याबाबत युक्रेनकडून कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही. पण रशियाने हा दावा केला आहे. युध्द सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच युक्रेननं थेट रशियात घुसून हल्ला केल्यानं दोन्ही देशांतील संघर्ष आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Ukrainian Helicopters Strike at Russian Oil Depot
सर्वोच्च न्यायालयाकडून ठाकरे सरकारला सात दिवसांत दुसरा धक्का

गव्हर्नर ग्लॅडकोव्ह यांनी सांगितले की, युक्रेनच्या दोन हेलिकॉप्टरने केलेल्या एअरस्ट्राईकमुळे ऑईल डेपोला आग लागली आहे. रशियात येऊन या हेलिकॉप्टर्सने हल्ला केला असून या हल्ल्यात कुणाचाही मृत्यू झालेला नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. आपत्कालीन सेवेतील कर्मचाऱ्यांकडून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. परिसरातील नागरिकांना कोणाताही धोका नाही, असंही त्यांनी सांगितले.

ऑईल डेपोच्या परिसरातील काही नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे. या घटनेत दोघे जखमी झाले आहे. हल्ल्यामुळे इंधनाच्या आठ टाक्यांना आग लागली आहे. जवळपास 200 जवान ही आग विझवत आहेत. ऑईल डेपोला आग लागल्यानंतर इंधन भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आहे. ग्लॅडकोव्ह यांना घाबरून न जाण्याचे आवाहन नागरिकांना केलं आहे. इंधनाची कोणतीही समस्या नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Ukrainian Helicopters Strike at Russian Oil Depot
मी शरद पवारांच्या पाया पडलो पण माध्यमांसमोर त्यांना काय झालं!

या आठवड्याच्या सुरूवातीला बेलगोरोडमधील शस्त्रांच्या डेपोजवळ स्फोटाचे मोठे आवाज आले होते. पण सरकारकडून याबाबत कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलं नव्हतं. हे शहर युक्रेनमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या खारकीवपासून केवळ 80 किलोमीटर अंतरावर आहे. या शहरावर रशियाकडून तुफान हल्ला चढवण्यात आला असून बहुतेक सहकारी इमारतींना लक्ष्य केलं आहे.

दोन्ही देशांच्या युध्दामध्ये सर्वसामान्य नागरिकांचेही बळी जात आहे. युक्रेननं दिलेल्या माहितीनुसार, रशियाच्या हल्ल्यात आतापर्यंत 153 लहान मुलांचा मृत्यू झाला असून 245 हून अधिक मुलं जखमी झाली आहेत. तसेच शेकडो नागरिकांचाही मृत्यू झाल्याचा दावा युक्रेननं केला आहे. रशियाच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना युक्रेनंनं अनेक रशियन विमाने, हेलिकॉप्टर, रणगाडे उद्धस्त केल्याचे म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com